पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त या योजनेच्या परिवर्तनकारी परिणामांची केली प्रशंसा.
Posted On:
08 APR 2025 9:08AM by PIB Mumbai
देश #10YearsOfMUDRA साजरे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या (पीएमएमवाय) लाभार्थ्यांचे अभिनंदन केले.
स्वप्नांना सक्षम बनवण्याचे आणि समावेशक आर्थिक विकासाला चालना देण्याचे दशक साजरे होत असताना, पंतप्रधानांनी भारतातील उपेक्षित समुदायांच्या उत्कर्षात आणि त्याच्या नवउद्योजकतेला चालना देण्यात मुद्रा योजनेने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या थ्रेडमध्ये म्हटले आहे;
“आज, #10YearsOfMUDRA साजरे करत असताना, या योजनेमुळे ज्यांचे जीवन बदलले आहे त्या सर्वांचे मी अभिनंदन करू इच्छितो. गेल्या दशकात मुद्रा योजनेने अनेक स्वप्नांना प्रत्यक्षात आणले असून, पूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना आर्थिक पाठबळ देऊन सक्षम केले आहे. ही योजना हे सिद्ध करते की भारतातील जनतेसाठी काहीही अशक्य नाही!"
"मुद्रा योजनेतील निम्मे लाभार्थी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायातील आहेत आणि या योजनेतच्या 70% पेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत हे विशेषतः आनंददायी आहे! प्रत्येक मुद्रा कर्ज आपल्यासोबत लाभार्थ्यांच्या जीवनात प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि संधी घेऊन येते. या योजनेने आर्थिक समावेशाव्यतिरिक्त, सामाजिक समावेश आणि आर्थिक स्वातंत्र्य देखील सुनिश्चित केले आहे."
"येणाऱ्या काळात, आमचे सरकार एक मजबूत परिसंस्था सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करत राहील जिथे प्रत्येक इच्छुक नवउद्योजकाला कर्ज उपलब्ध असेल तसेच त्याला आत्मविश्वास वाढवण्याची आणि प्रगतीची संधी मिळेल.”
***
SonalT/S.Mukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2119999)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam