माहिती आणि प्रसारण मंत्रालय
तुमच्या वृत्तांकनातून होऊ देत वेव्हज अर्थात आशयघन लहरींची निर्मिती !
जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 साठी माध्यम प्रतिनिधींची नोंदणी सुरू झाली आहे
मुंबईत 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होणाऱ्या वेव्हज पदार्पण शिखर परिषदेत मनोरंजन क्षेत्रातील भविष्याचा अनुभुती घ्या!
Posted On:
26 MAR 2025 3:10PM by PIB Mumbai
मुंबई, 26 मार्च 2025
मुंबईत 1 ते 4 मे 2025 दरम्यान होणारी पहिली वाहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) ही जागतिक माध्यमे आणि मनोरंजन (एम आणि ई) उद्योगात लाटा निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. परिषदेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असताना आता परिषदेच्या वृत्तांकनासाठी येवू इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीला 25 मार्च 2025 पासून प्रारंभ झाला आहे. या नोंदणीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार, छायाचित्रकार, आशय निर्माते आणि माध्यम विश्वातील तज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. नोंदणी करा आणि प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार दर्शवणारे वृत्तांकन करून जगातील आशयनिर्मात्यांना जोडण्यासाठी आणि भारतातील माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राला अधिक समृद्ध करण्यासाठी सज्ज व्हा. तुमचे वार्तांकन खरोखर वेव्हज अर्थात माहितीविषयक तरंग निर्मिती करेल.

जर तुम्हाला पत्रकारिता, माध्यम उद्योग किंवा आशय कथनाची आवड असेल, तुम्ही पत्रकार असाल , कॅमेरापर्सन, आशय निर्माते किंवा समाज माध्यमातील व्यावसायिक असाल, तर तुम्ही वेव्हज 2025 चुकवू शकत नाही! येथे होणाऱ्या चर्चासत्रात सहभागी व्हा, उद्योगधुरीणांकडून शिका आणि उदयोन्मुख क्रिएटर्सना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सहाय्य करा. वेव्हज शिखर परिषद 2025 हे तुमच्यासाठी उद्योगांची अंतर्दृष्टी प्रदान करणारे, जागतिक नेटवर्किंग तसेच माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील अभूतपूर्व नाविन्यपूर्ण कल्पनांचा वेध घेण्यासाठी एक खुले प्रवेशद्वार ठरेल.
माध्यम प्रतिनिधींची नोंदणी प्रक्रिया
वेव्हज माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी, अर्जदारांनी हे करणे आवश्यक आहे:
✅ 1 जानेवारी 2025 पर्यंत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असावे.
✅ मान्यताप्राप्त प्रसार माध्यमांवर वार्ताहर, छायाचित्रकार, कॅमेरा पर्सन किंवा डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून काम केलेले असावे.
✅ वरील निकष पूर्ण करणारे फ्रीलांस पत्रकार देखील पात्र आहेत.
✅ ऑनलाइन नोंदणी करा: https://app.wavesindia.org/register/media
✅ नोंदणी कधी सुरु होणार : 26 मार्च 2025
✅ नोंदणी अंतिम तारीख: 10 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:59 (IST)
✅ माध्यम प्रतिनिधी पास संकलन: मान्यता मिळालेल्या माध्यम प्रतिनिधींना माध्यम प्रतिनिधी पास संकलन करण्यासंदर्भातील तपशीलांची माहिती योग्य वेळी दिली जाईल.
✅ माध्यम प्रतिनिधी नोंदणी धोरणाविषयीच्या माहितीसाठी येथे पहा.
✅ परिशिष्ट ब नुसार माध्यम प्रतिनिधी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी येथे शोधा.
✅ काही प्रश्न किंवा शंका असल्यास ‘WAVES Media Accreditation Query’. या शीर्षकासह pibwaves.media[at]gmail[dot]com वर ईमेलद्वारा संपर्क करा.
नोंदणी प्रक्रियेच्या वेळी सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड केले आहेत याची कृपया खात्री करून घ्या. सर्व अर्जांची पडताळणी केल्यानंतर मीडिया अॅक्रिडिटेशनची मंजुरी ईमेलद्वारे कळवली जाईल. फक्त पीआयबी-मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधीच, माध्यम प्रतिनिधी पाससाठी पात्र असतील. याविषयीची मान्यता, माध्यम संस्थेचा आवाका, पुनरावृत्ती, मनोरंजन क्षेत्राला दिलेले प्राधान्य आणि वेव्हज च्या अपेक्षित वृत्तांकनावर आधारित असेल.
वेव्हज का?
तुम्ही या उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक असा अथवा, गुंतवणूकदार, सर्जक अथवा नाविन्यपूर्ण निर्मिती करणारे असा, या शिखर परिषदेत तुम्हाला इतरांशी जोडले जाण्यासाठी, सहयोगासाठी, नव्या संशोधनासाठी तसेच माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या परीदृश्यात योगदान देण्यासाठी अनोखा जागतिक मंच उपलब्ध होईल.
वेव्हज हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच जागतिक व्यासपीठ आहे जे आशय सामग्री निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तांत्रिक नवोन्मेष यांसाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावत देशाच्या सर्जनशील क्षमतेला बळकटी देईल. हा कार्यक्रम उद्योगातील आघाडीच्या व्यावसायिकांना एकत्र आणेल : प्रसारण, मुद्रित माध्यमे, दूरदर्शन, आकाशवाणी, चित्रपट, ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल माध्यम, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्धित वास्तव (अग्युमेन्तेड रियालिटी), आभासी वास्तव (व्हीआर) आणि विस्तारित वास्तव (एक्सआर).
प्रमुख ठळक कार्यक्रम जे तुम्ही चुकवू शकत नाही
- ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज - जगभरातील नवोदित निर्मात्यांच्या प्रतिभेचा अविष्कार साजरा करणारा एक अभूतपूर्व उपक्रम, अर्थात मुंबईत होणाऱ्या वेव्हज 2025 मध्ये आपल्या प्रतिभेची झलक दाखवण्यासाठी ‘वेव्हज’ हे एक आघाडीचे व्यासपीठ म्हणून सज्ज आहे.
- वेव्हेक्स 2025 - हा उपक्रम एक मैलाचा दगड ठरणारा असून यामाध्यमातून मीडिया-टेक स्टार्टअप्स त्यांच्या नवकल्पना आघाडीच्या उद्योग धुरिणांसमोर आणि सेलिब्रिटी एंजल गुंतवणूकदारांसमोर सादर करतील, ज्यामुळे भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या भविष्याला नवीन दिशा मिळेल.
- वेव्हज बाजार: चित्रपट, गेमिंग, संगीत, जाहिरात आणि एक्सआर, निर्माते, गुंतवणूकदार आणि इतर व्यवसायांना जोडणारी एक अद्वितीय जागतिक बाजारपेठ. यातूनच उद्योग व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याच्या संधी देखील देते.
- मास्टरक्लासेस आणि परस्परसंवादी सत्रे - उद्योगातील दिग्गज आणि जागतिक नेत्यांकडून शिकण्याची, माध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्याची एक दुर्मिळ संधी.
या आमच्याबरोबर या लाटांवर स्वार व्हा, जर तुम्ही अभ्यागत असाल तर येथे नोंदणी करा; आणि जर विद्यार्थी असाल तर येथे नोंदणी करा
पीआयबीच्या टीम वेव्हज कडून येणाऱ्या नवीनतम घोषणांसह अपडेट राहा.
तुम्हाला काही प्रश्न आहेत का ? येथे त्यांची उत्तरे मिळावा.
* * *
PIB TEAM WAVES 2025| JPS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115213)
Visitor Counter : 37
Read this release in:
Odia
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Assamese
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam