माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेव्हज बाजार: माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी सर्वोत्तम व्यवसाय सहयोग केंद्र

Posted On: 03 MAR 2025 8:42PM by PIB Mumbai

मुंबई, 3 मार्च 2025

माध्यम आणि मनोरंजन उद्योगात अभूतपूर्व डिजिटल परिवर्तन होत आहे आणि वेव्हज बाजार हा या उत्क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे.

वेव्हज बाजारचा प्रारंभ

वेव्हज बाजारचे अधिकृत उदघाटन 27 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते झाले.

वेव्हज बाजार म्हणजे काय?

चित्रपट, दूरचित्रवाणी, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, जाहिरात, एक्सआर, संगीत, ध्वनी संयोजन, रेडिओ यासह अनेक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील हितधारकांना एकत्र आणणारे वेव्हज बाजार ही एक अनोखी ई- बाजारपेठ आहे. उद्योग व्यावसायिक त्यांचे कौशल्य सहजपणे प्रदर्शित करू शकतील, संभाव्य ग्राहकांशी जोडले जाऊ शकतील आणि अर्थपूर्ण सहकार्य मिळवू शकतील याची खात्री करून हा मंच खरेदीदार आणि विक्रेत्यांमधील दुवा म्हणून काम करतो.

वेव्हज बाजार ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे

• व्यापक उद्योग एकत्रीकरण - चित्रपट, दूरचित्रवाणी, संगीत, गेमिंग, अ‍ॅनिमेशन, जाहिरात आणि एक्सआर, एआर आणि व्हीआर सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी एक एकीकृत जागा.

• जागतिक व्याप्ती - तुमचा व्यवसाय सीमापार नेऊन मनोरंजन उद्योगातील आंतरराष्ट्रीय हितधारकांशी संवाद साधा.

• नेटवर्किंग आणि सहयोग - समान विचारसरणीचे व्यावसायिक, सेवा प्रदाते, खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना भेटा, संवाद साधा आणि सहयोग करा.

• सुव्यवस्थित खरेदीदार-विक्रेता व्यवहार - एक संरचित, वापरण्यास सोपा प्लॅटफॉर्म जो सेवा प्रदाते आणि संभाव्य क्लायंटमध्ये सहज व्यवसाय संवाद सक्षम करतो.

• विविध सूची संधी - चित्रपट निर्मिती सेवा, व्हीएफएक्स, जाहिरात, ध्वनी संयोजन, संगीत निर्मिती, गेमिंग, अ‍ॅनिमेशन आणि यासारख्या अन्य श्रेणींमध्ये विक्रेते त्यांच्या ऑफर प्रदर्शित करू शकतात.

• विशेष उद्योग कार्यक्रम आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश - वेव्हज प्लॅटफॉर्म अंतर्गत उद्योग-विशिष्ट कार्यक्रम, गुंतवणूकदारांच्या बैठका आणि विशेष बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवा.

वेव्हज बाजाराचे विविध स्तर

वेव्हज बाजारची रचना अनेक स्तरांमध्ये केली आहे, प्रत्येक स्तर माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या विशिष्ट विभागासाठी तयार केला आहे. यामध्ये समाविष्ट बाबी:

1. वेव्हज बाजार: जाहिरात सेवांसाठी जागतिक ई-मार्केटप्लेस

जाहिरातदार, मार्केटर्स आणि माध्यमातील खरेदीदारांसाठी जाहिरात मार्गांचा धांडोळा घेऊन ते अवलंबण्याकरिता एक समर्पित स्थान.

2. वेव्हज बाजार: थेट कार्यक्रमांसाठी सर्वोत्तम बाजारपेठ

थेट मनोरंजन क्षेत्रातील कार्यक्रम आयोजक, विक्रेते आणि सेवा प्रदात्यांना एकत्र आणणे.

3. वेव्हज बाजार: अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्स सेवांसाठी जागतिक बाजारपेठ

अ‍ॅनिमेशन स्टुडिओ, व्हिज्युअल इफेक्ट्स कलाकार आणि पोस्ट-प्रॉडक्शन हाऊसेससाठी त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक केंद्र.

4. वेव्हज बाजार: एक्सआर, व्हीआर आणि एआर सेवांसाठी जागतिक बाजारपेठ

एक्सटेंडेड रिअ‍ॅलिटी (एक्सआर) व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेले, हे विभाग व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हीआर), ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (एआर) आणि मिक्स्ड रिअ‍ॅलिटी (एमआर) मधील नवोन्मेषकांना खिळवून ठेवणाऱ्या अनुभूतींद्वारे त्यांचा आशय अधिक प्रगल्भ करू पाहणाऱ्या व्यवसायांशी जोडते.

5. वेव्हज बाजार: चित्रपटांसाठी जागतिक बाजारपेठ

चित्रपट निर्माते, वितरक आणि गुंतवणूकदारांसाठी वन-स्टॉप ठिकाण.

6. वेव्हज बाजार: गेम निर्मात्यांसाठी भव्य बाजारपेठ

गेमिंग डेव्हलपर्स, स्टुडिओ आणि प्रकाशकांसाठी, हे ठिकाण गुंतवणूकदार, व्हॉइस आर्टिस्ट, संगीतकार आणि विपणन तज्ञांशी संपर्क साधण्यात मदत करते.

7. वेव्हज बाजार: रेडिओ आणि पॉडकास्टसाठी जागतिक बाजारपेठ

रेडिओ स्टेशन, पॉडकास्टर आणि ऑडिओ कंटेंट निर्मात्यांसाठी त्यांच्या सेवा सूचीबद्ध करण्यासाठी, प्रायोजक शोधण्यासाठी आणि प्रकल्पांवर सहयोग करण्यासाठी एक समर्पित जागा.

8. वेव्हज बाजार: कॉमिक्स आणि ई-पुस्तकांसाठी जागतिक बाजारपेठ

लेखक, चित्रकार आणि प्रकाशक त्यांच्या कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वितरक आणि सामग्री प्लॅटफॉर्मशी संपर्क साधू शकतात.

9. वेव्हज बाजार: वेब-सिरीजसाठी जागतिक बाजारपेठ

ओटीटी प्लॅटफॉर्म, स्वतंत्र निर्माते आणि डिजिटल स्टुडिओ नवीन प्रतिभा शोधू शकतात, प्रकल्प सादर करू शकतात आणि जगभरातील प्रेक्षकांसाठी एपिसोडिक कंटेंटवर सहयोग करू शकतात.

10. वेव्हज बाजार: संगीत आणि ध्वनीसाठी जागतिक बाजारपेठ

संगीतकार, ध्वनी डिझायनर्स आणि निर्मिती संस्थांना चित्रपट निर्माते, जाहिरातदार तसेच मूळ रचना आणि ऑडिओ सोल्यूशन्स शोधणाऱ्या गेमिंग कंपन्यांशी संवाद साधण्यासाठी एक समर्पित परिसंस्था.

वेव्हज बाजारात कोणी सामील व्हावे?

वेव्हज बाजार मीडिया, मनोरंजन आणि सर्जनशील क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांसाठी खुला आहे, परंतु इतकेच मर्यादित नाही:

विक्रेत्यांसाठी:

• चित्रपट निर्माते आणि स्टुडिओ

• अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्स स्टुडिओ

• गेमिंग आणि एक्सआर डेव्हलपर्स

• संगीत आणि ध्वनी व्यावसायिक

• जाहिरात आणि विपणन एजन्सी

• रेडिओ आणि पॉडकास्ट निर्माते

• लेखक आणि ई-बुक प्रकाशक

खरेदीदारांसाठी:

• कंटेंट संपादनाच्या शोधात असलेल्या चित्रपट निर्मिती संस्था आणि ओटीटी प्लॅटफॉर्म

• जाहिरात भागीदार शोधत असलेल्या मीडिया एजन्सी आणि ब्रँड

• अ‍ॅनिमेशन आणि ध्वनी सेवा शोधणारे गेम डेव्हलपर्स

• प्रचारात्मक सहकार्याची आवश्यकता असलेले कार्यक्रम आयोजक

• सर्जनशील सामग्री समाधान शोधत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्था

वेव्हज बाजार कसे कार्य करते

• वेव्हज बाजार संकेतस्थळाला भेट द्या - wavesbazaar.com वर जा आणि मंचाची शोधसफर करा.

• साइन अप करा आणि तुमचे प्रोफाइल तयार करा – संधींच्या संपूर्ण श्रेणीमध्ये प्रवेश करण्यासाठी खरेदीदार, विक्रेता किंवा गुंतवणूकदार म्हणून नोंदणी करा.

• तुमच्या सेवा किंवा प्रकल्पाच्या गरजा सूचिबद्ध करा – तुमचे काम प्रदर्शित करा किंवा तुमच्या व्यवसायाच्या आवडीनुसार तयार केलेल्या उपलब्ध सूचींचा शोध घ्या.

• कनेक्ट व्हा आणि सहयोग करा – उद्योग व्यावसायिकांशी नेटवर्किंग करा, बैठका ठरवा आणि यशस्वी सहयोग सुरू करा.

• तुमचा व्यवसाय वाढवा – तुमचा बाजार वाढवा, उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधा आणि दीर्घकालीन भागीदारी स्थापित करा.

वेव्हज बाजार उद्योगासाठी गेम-चेंजर का आहे

जलदपणे उत्क्रांत होत असलेल्या डिजिटल लँडस्केपमध्ये वेव्हज बाजार भौगोलिक अडथळे दूर करून तसेच संरचित, श्रेणी-विशिष्ट बाजारपेठ उपलब्ध करून देऊन मनोरंजन व्यावसायिकांना जोडण्याच्या आणि व्यवसाय करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवत आहे.

आता नोंदणी करा: wavesbazaar.com

काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा.


N.Chitale/V.Joshi/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2107909) Visitor Counter : 15