माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हेक्स 2025: प्रसार माध्यमे आणि मनोरंजन स्टार्टअप्ससाठी एक गेम-चेंजर
वेव्हेक्स 2025 मध्ये स्टार्ट अपसाठीचे भांडवलदार / एंजल गुंतवणूकदारांसाठी स्टार्टअप्स सादर करणार कल्पना
वेव्हेक्स 2025 स्टार्टअप्सना गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी उघडणार दरवाजे
Posted On:
18 MAR 2025 9:00PM by PIB Mumbai
मुंबई, 18 मार्च 2025
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (एमआयबी), प्रसार माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्सना निधी तसेच राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचा उद्देश असणारा एक अग्रगण्य उपक्रम ‘वेव्हेक्स 2025’ चा प्रारंभ केला आहे. इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) च्या सहकार्याने आयोजित, वेव्हेक्स 2025 हा उपक्रम 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट) (वेव्हज) चा भाग म्हणून मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केला जाणार आहे.
वेव्हेक्स 2025 भारतीय स्टार्टअप्सना या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल, जेणेकरून त्यांना त्यांच्या व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी योग्य संधी आणि गुंतवणूक मिळेल. स्टार्टअप्सना समर्पित सत्रांमध्ये व्हेन्चर म्हणजेच स्टार्ट अप्ससाठीचे भांडवलदार आणि सेलिब्रिटी एंजल गुंतवणूकदारांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमाला राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रदर्शनाची संधी मिळणार असल्यामुळे या स्टार्टप्सची जास्तीत जास्त दृश्यता सुनिश्चित होणार आहे.
वेव्हेक्स 2025 हा उपक्रम गेमिंग, ॲनिमेशन, एक्सटेंडेड रिॲलिटी (XR), मेटाव्हर्स, जनरेटिव्ह एआय आणि पुढच्या पिढीतील आशय व्यासपीठावर लक्ष केंद्रित करेल. निधी गोळा करण्याच्या पलीकडे जाऊन हा कार्यक्रम प्रमुख मीडिया आणि तंत्रज्ञान कंपन्यांसह मार्गदर्शन, गुंतवणूकदार नेटवर्किंग आणि सहयोगाची संधी प्रदान करतो. हा कार्यक्रम उद्योजक, व्हेन्चर भांडवलदार, एंजल गुंतवणूकदार आणि उद्योगातील प्रमुखांना एकत्र आणणार आहे. हे प्रदर्शन केवळ थेट निधी संकलन सुरक्षित करण्यास मदत करणार नाही तर व्यापक व्यवसाय आणि सहकार्याच्या संधी देखील निर्माण करेल. मनोरंजन आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण आशय निर्मिती कशी केली जाते, कशी वितरित केली जाते आणि कशी वापरली जाते यात बदल घडवते.
वेव्हेक्स 2025 मध्ये गुंतवणूक सत्रांचे दोन प्रकार असतील. एका सत्रात, स्टार्टअप्स व्हेन्चर गुंतवणूकदार आणि एंजल गुंतवणूकदारांना आकर्षित करतील करतील, तर दुसऱ्या सत्रात, निवडक स्टार्टअप्स सेलिब्रिटी एंजल गुंतवणूकदारांच्या समूहासमोर त्यांचे विचार मांडतील. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर या कार्यक्रमाचे प्रसारण मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे, त्यामुळे सहभागी स्टार्टअप्सची व्यापक प्रसिद्धी आणि गुंतवणूकीचे मार्ग जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील.
वेव्हज 2025 साठी अर्ज खुले आहेत आणि हा कार्यक्रम बहु-स्तरीय निवड प्रक्रियेसह असणार आहे. ज्याचा शेवटचा टप्पा उत्कंठावर्धक अशी दूरचित्रवाणीवर होणारी अंतिम फेरी असेल. या अंतिम फेरीत सर्वांत होतकरू स्टार्टअप्स थेट प्रख्यात सेलिब्रिटी, एंजल गुंतवणूकदार आणि व्हेंचर भांडवलदार समोर आपली कल्पना मांडतील. निवडलेल्या स्टार्टअप्सना उद्योग तज्ज्ञांकडून संरचित मार्गदर्शन कार्यक्रम, गुंतवणूकदार नेटवर्किंग संधी, तसेच प्रमुख माध्यम आणि तंत्रज्ञान कंपन्यांसोबत सहभागी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते.
वेव्हज हा भारताला मीडिया-टेक उद्योजकतेला जागतिक केंद्रस्थानी आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित आशय, डिजिटल मीडिया आणि नव्याने उदयास येणाऱ्या मनोरंजन तंत्रज्ञानातील नाविन्याचा उपयोग करून या कार्यक्रमाद्वारे भारताला या क्षेत्रातील आघाडीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातील वेव्हजसाठी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी यावर प्रकाश टाकला की, भारताला मीडिया-टेक नाविन्याचा आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू बनवण्याच्या दृष्टीने ही योजना एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
भारत डिजिटल आशय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक दृष्ट्या आघाडीवर जाण्यासाठी पुढे जात असताना, वेव्हज 2025 स्टार्टअप्ससाठी या उद्योगात स्वतःला प्रस्थापित करण्याची एक क्रांतिकारी संधी प्रदान करतो. राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी, भांडवली गुंतवणूक आणि उच्च दर्जाचे मार्गदर्शन शोधणाऱ्या उद्योजकांसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी आता उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी येथे भेट द्या – https://wavex.wavesbazaar.com/
वेव्हज बद्दल
प्रथमच आयोजित केला जाणारा जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) हा मीडिया आणि मनोरंजन (एम अँड ई) क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणारा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम भारत सरकारतर्फे महाराष्ट्रातील मुंबई येथे 1 मे ते 4 मे 2025 या कालावधीत आयोजित केला जाणार आहे.
काही प्रश्न आहेत?
उत्तरे येथे शोधा.
चला,आमच्यासह वेव्हजसाठी लवकरच नोंदणी सुरू करा
(लवकरच येत आहे )
N.Chitale/S.Mukhedkar/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2112566)
Visitor Counter : 57