पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा या विषयावरील जी 20 सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित

प्रविष्टि तिथि: 18 NOV 2024 9:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा’ या विषयावरील जी  20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला आज संबोधित केले. शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि प्रेमळ आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे अध्यक्ष महामहिम लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांचे आभार मानले. शाश्वत विकास उद्दिष्टांवर केंद्रित  ब्राझीलच्या जी 20 कार्यक्रम पत्रिकेचे  त्यांनी कौतुक केले. हा दृष्टिकोन ग्लोबल साऊथच्या समस्या अधोरेखित करतो तसेच नवी दिल्ली जी 20 शिखर परिषदेचे लोककेंद्रित निर्णय पुढे नेतो असे पंतप्रधानांनी नमूद केले. "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" साठी भारतीय जी 20 अध्यक्षतेने दिलेला नारा रिओ चर्चेत देखील गुंजत असल्याचे त्यांनी  अधोरेखित केले.

उपासमार आणि गरिबीचा सामना करण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल  बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, भारताने गेल्या दहा वर्षांत 250 दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे आणि देशातील 800 दशलक्ष लोकांना मोफत अन्नधान्य वितरित केले आहे. अन्न सुरक्षा हाताळण्यात भारताने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी ‘मूलभूत तत्वांचे पालन आणि भविष्याकडे वाटचाल’ यावर आधारित भारताचा दृष्टीकोन परिणामकारक ठरत असल्यावर भर दिला. महिला-प्रणित विकासाला चालना देण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांबद्दल  त्यांनी  माहिती दिली.

आफ्रिका आणि अन्यत्र अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने उचललेली पावले पंतप्रधानांनी अधोरेखित केली. या संदर्भात, उपासमार  आणि गरिबीविरोधात जागतिक आघाडी स्थापन करण्याच्या ब्राझीलच्या पुढाकाराचे त्यांनी स्वागत केले. सध्या सुरु असलेल्या संघर्षांमुळे ग्लोबल साउथला अन्न, इंधन आणि खतांच्या गंभीर संकटांचा सामना करावा लागत आहे , त्यामुळे त्यांच्या समस्यांना  प्राधान्य दिले गेले पाहिजे असे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण येथे पाहता येईल.

 

* * *

JPS/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2074526) आगंतुक पटल : 69
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , Telugu , Manipuri , English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam