पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाओ पीडीआरच्या राष्ट्रपतींची घेतली भेट

Posted On: 11 OCT 2024 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  लाओ पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी (एलपीआरपी)चे सरचिटणीस आणि लाओ पीडीआरचे राष्ट्रपती  थोंगलोउन सिसौलिथ यांची आज व्हिएन्टिनमध्ये भेट घेतली. आसियान शिखर परिषद आणि पूर्व आशिया शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी अध्‍यक्ष सिसौलिथ यांचे अभिनंदन केले.

यावेळी उभय  नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आणि दोन्ही देशांमधली घनिष्ठ भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या  वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत-लाओस यांच्यातील  समकालीन भागीदारीची मुळे  ही प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या संस्‍कृती-संबंधात खोलवर रुजली गेली  आहेत, असे यावेळी दोन्‍ही नेत्यांनी  नमूद केले.  विकासामध्‍ये  भागीदारी, वारसा स्‍थानांचा  जीर्णोद्धार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या सहकार्याबद्दल उभय नेत्यांनी  समाधान व्यक्त केले. 2024 हे भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट पॉलिसी’ चे दशक असल्याचे   अधोरेखित करून पंतप्रधानांनी लाओससोबत भारताच्या संलग्नतेला आणखी गती देण्याचे महत्त्व लक्षात घेतले. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक  संबंधांचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी नव्या नालंदा विद्यापीठामध्‍ये असलेल्या संधींद्वारे थेट लोक-लोकांमध्‍ये  संबंध दृढ करण्याचे आवाहन केले. टायफून यागीमुळे आलेल्या पूर संकटाच्‍या  पार्श्वभूमीवर लाओ पीडीआरला भारताने मानवतावादी दृष्‍टीकोनातून  मदत केल्याबद्दल राष्ट्रपती सिसौलिथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

भारत-आसियान संबंध मजबूत करण्यासाठी लाओसने दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती सिसौलिथ यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली.

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2064163) Visitor Counter : 28