पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
'एक पेड माँ के नाम' मोहिमेअंतर्गत देशभरात 52 कोटींहून अधिक वृक्षांचे रोपण
Posted On:
03 SEP 2024 9:50AM by PIB Mumbai
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता या मोहिमेचा शुभारंभ.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज X या समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे माहिती दिली की, देशाने ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेअंतर्गत वृक्षारोपणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशात 52 कोटींहून अधिक झाडे लावण्यात आली आहे, अशीही माहिती यादव यांनी दिली आहे.
05.06.2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एक पेड माँ के नाम’ या मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला होता. या उपक्रमाद्वारे सर्वांनी वसुंधरेच्या हितासाठी आणि आपल्या शाश्वत विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी या मोहीमेच्या प्रारंभी केले होते.
यासंदर्भातील पूर्वीचे प्रसिद्धीपत्रक आपण खालील लिंकवर वाचू शकता:
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2022815
***
JPS/SM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2051213)
Visitor Counter : 169
Read this release in:
Telugu
,
Urdu
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Kannada
,
Khasi
,
English
,
Hindi
,
Bengali-TR
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam