पंतप्रधान कार्यालय

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये दुसरे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीती पाल हिचे अभिनंदन केले.

Posted On: 02 SEP 2024 12:01AM by PIB Mumbai

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये दुसरे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीती पाल हिचे अभिनंदन केले. 

सध्या सुरु असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये दुसरे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट प्रीती पालचे अभिनंदन केले.
 
23 वर्षीय प्रीतीने महिलांच्या 200 मीटर T35 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले असून  पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट बनली आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे : 

"पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 200 मीटर T35 स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आणि या स्पर्धेतील हे दुसरे पदक जिंकून प्रीती पालने खरोखर एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतातील नागरिकांसाठी ती प्रेरणादायक आहे. तिची समर्पणवृत्ती वाखाणण्याजोगी आहे. #Cheer4Bharat"

***

SonalT/BhaktiS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2050752) Visitor Counter : 49