पंतप्रधान कार्यालय

नेपाळचे परराष्ट्र मंत्री डॉ आरजू राणा देउबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Posted On: 19 AUG 2024 10:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2024

नेपाळचे परराष्ट्र मंत्री डॉ आरजू राणा देउबा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

डॉ.देऊबा यांचे भारतात स्वागत करताना पंतप्रधान मोदी यांनी भारत-नेपाळ दरम्यानच्या विकास भागीदारीला गती मिळत राहील, अशी आशा व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी यांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

“नेपाळचे परराष्ट्र मंत्री @Arzuranadeuba यांचे स्वागत करताना आनंद झाला. भारत आणि नेपाळमध्ये घनिष्ट सांस्कृतिक संबंध, तसेच प्रगतीशील आणि बहुआयामी भागीदारी आहे. आमच्या विकास भागीदारीला गती मिळत राहील,अशी आशा व्यक्त करतो.”  

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2047387) Visitor Counter : 7