पंतप्रधान कार्यालय
जपानचे परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले
Posted On:
19 AUG 2024 10:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2024
जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिकावा योको आणि संरक्षणमंत्री किहारा मिनोरु यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी काळात आयोजित तिसऱ्या भारत-जपान 2+2 परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्री स्तरीय बैठकीपूर्वी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी दोन्ही मंत्र्यांचे स्वागत केले. या वेळी पंतप्रधानांनी भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण आणि सुरक्षाविषयक संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला.
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“तिसऱ्या भारत-जपान 2+2 परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्री स्तरीय बैठकीपूर्वी जपानचे परराष्ट्रमंत्री @Kamikawa_Yoko आणि संरक्षणमंत्री @kihara_minoru यांना भेटून आनंद झाला. आम्ही भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण आणि सुरक्षाविषयक संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. हिंद-प्रशांत आणि त्यापलीकडील प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि समृद्धता यांना चालना देण्यात भारत-जपान भागीदारीच्या भूमिकेला आम्ही दुजोरा दिला.”
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2047380)
Visitor Counter : 33
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam