माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यमे सन्मान 2024 साठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 पर्यंत वाढवली

Posted On: 10 JUL 2024 10:52AM by PIB Mumbai

आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 विषयी जागरूकता निर्माण करण्यात प्रसार माध्यमांनी निभावलेली सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी यांची नोंद घेत आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तिसऱ्या वर्षीच्या म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यमे सन्मान (एवायडीएमएस)2024 साठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत, सोमवार, 15 जुलै 2024 पर्यंत वाढवली.
आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यमे सन्मान 2024 करिता यंदाच्या तिसऱ्या वर्षीच्या सन्मानांसाठी प्रसारमाध्यम कंपन्या त्यांच्या प्रवेशिका आणि माहिती येत्या 15 जुलै 2024 पर्यंत aydms2024.mib[at]gmail[dot]com या ईमेलआयडीवर पाठवू शकतात. या सन्मानसंबंधी उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक तपशीलवार मार्गदर्शक सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या https://mib.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच पत्रसूचना कार्यालयाच्या https://pib.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

***

SushmaK/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032044) Visitor Counter : 45