पंतप्रधान कार्यालय

इस्लामी प्रजासत्ताक इराणच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महामहीम मसूद पेझेश्कियान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 06 JUL 2024 3:16PM by PIB Mumbai

 

इस्लामी प्रजासत्ताक इराणच्या अध्यक्षपदी महामहिम मसूद पेझेश्कियान यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट केले;

इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल @drpezeshkian यांचे अभिनंदन. भारत आणि इराण मधील दीर्घकालीन सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करत, दोन्ही देशांमधील नागरिक आणि या प्रदेशाच्या हितासाठी काम करण्यासाठी आपण  उत्सुक आहोत.

***

S.Patil/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031314) Visitor Counter : 41