पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी ऋषी सुनक यांचे त्यांच्या नेतृत्वासाठी मानले आभार

प्रविष्टि तिथि: 05 JUL 2024 7:17PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंतप्रधानपदावरून पायउतार झालेले ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचे त्यांच्या नेतृत्वासाठी आणि भारत-ब्रिटन भागीदारीत योगदान दिल्याबद्दल आज आभार मानले.

पंतप्रधान मोदी  आपल्या एक्स वरील  संदेशात म्हणाले,

धन्यवाद @RishiSunak.  ब्रिटनच्या  तुमच्या प्रशंसनीय नेतृत्वासाठी आणि भारत, ब्रिटन यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी तुमच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत तुम्ही केलेल्या सक्रीय योगदानाबद्दल. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भविष्यासाठी उत्तमोत्तम शुभेच्छा.

***

S.Kakade/R.Bedekar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2031156) आगंतुक पटल : 111
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Telugu , English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam