भारतीय निवडणूक आयोग

सातव्या टप्प्यात रात्री 11.45 वाजताच्या आकडेवारीनुसार 61.63 % मतदारांनी केले मतदान

Posted On: 02 JUN 2024 12:08AM by PIB Mumbai

 

सार्वत्रिक निवडणुकांच्या सातव्या टप्प्यात रात्री 11.45 वाजताच्या आकडेवारी नुसार अंदाजित 61.63 % मतदानाची नोंद झाली आहे. याधीच्या टप्प्यांप्रमाणेच मतदान पक्ष ठराविक अंतराने परतत असल्याने ही आकडेवारी क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारे अद्ययावत केली जात राहणार आहे आणि ती संसदीय मतदार संघानुसार (संबंधित विधानसभा मतदार संघासह) VTR ॲपवर थेट उपलब्ध असेल.

रात्री 11.45 वाजताच्या आकडेवारी नुसार राज्यनिहाय मतदारांनी केलेले अंदाजित मतदान खालीलप्रमाणे:-

 

अनु क्र

राज्य/केंद्रशासित प्रदेश

क्र.

संसदीय मतदारसंघ

मतदारांची अंदाजित

आकडेवारी %

1

बिहार

8

51.92

2

चंडीगड

1

67.9

3

हिमाचल प्रदेश

4

69.67

4

झारखंड

3

70.66

5

ओदिशा

6

70.67

6

पंजाब

13

58.33

7

उत्तर प्रदेश

13

55.59

8

पश्चिम बंगाल

9

73.36

वरील 8

राज्य/केंद्रशासित प्रदेश

57

61.63

 

येथे दर्शवलेली संकलित माहिती क्षेत्रीय अधिकाऱ्यांद्वारे संगणक प्रणालीत नोंद केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आहे, काही मतदान केंद्रांकडून (PS) प्राप्त होणाऱ्या माहितीसाठी वेळ लागतो आणि टपालाद्वारे झालेल्या मतदानाचा कल यात समाविष्ट नाही. प्रत्येक मतदान केंद्रात नोंदवलेल्या मतांची अंतिम वास्तविक आकडेवारी मतदान संपल्यावर अर्ज 17 सी द्वारे सर्व पोलिंग एजंटसह सामायिक केली जाते.

***

Jaydevi.PS/S.Naik/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022505) Visitor Counter : 51