भारतीय निवडणूक आयोग

लोकसभा निवडणूक 2024 चा 7 व्या  आणि शेवटच्या टप्यासाठी  उद्या मतदान


जगातील सर्वात मोठया मतदान महाभियानाची होणार सांगता

लोकसभेच्या 57 जागांसह ओदिशातील 42 विधानसभा मतदारसंघांत मतदानाची जय्यत  तयारी

व्याप्ती : 10.06 कोटी मतदार, 1.09 लाखाहून अधिक मतदान केंद्रे, 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश

मंगळवारी होणार मतमोजणी

Posted On: 31 MAY 2024 1:30PM by PIB Mumbai

 

भारतीय निवडणूक आयोग उद्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी सज्ज आहे.  बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओदिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. याच्या सोबतीला, ओदिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित 42 विधानसभा मतदारसंघांसाठीही याच वेळी मतदान होणार आहे.   गेल्या महिन्याच्या 19 तारखेपासून सुरू झालेल्या या मतदान महाभियानाची उद्या सांगता होणार आहे.  या महाभियानात या आधी 6 टप्प्यात 486 लोकसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले आहे.  28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 486 लोकसभा मतदारसंघातील मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले आहे.  4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदान यंत्रे आणि मतदान साहित्यासह मतदान अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.  मतदान सुखकर आणि सुरक्षित वातावरणात होईल याची खात्री करण्यासाठी पुरेशी सावली, पिण्याचे पाणी, रॅम्प आणि स्वच्छतागृहांसह सर्व मूलभूत सुविधांसह मतदारांचे स्वागत करण्यासाठी मतदान केंद्रे सज्ज आहेत.  हवामान विभागाने ज्या भागांसाठी उष्ण हवामान किंवा पावसाचा अंदाज वर्तवला असेल अशा भागात, संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य यंत्रणांनी प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उष्ण वातावरण असूनही, मतदारांनी मागील टप्प्यात मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. मागच्या दोन टप्प्यात, महिला मतदानाची टक्केवारी पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून आले आहे.  मतदारांनी घराबाहेर पडून जबाबदारी समजून घेत, अभिमानाने तसेच अधिकाधिक संख्येने मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

टप्पा 7 तथ्य :

1... सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या टप्पा-7 साठीचे मतदान 1 जून 2024 रोजी 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघांसाठी (सर्वसाधारण - 41; अनुसूचित जमाती - 03; अनुसूचित जाती -13) होणार आहे.  मतदान सकाळी 7 वाजता सुरू होते आणि मतदान बंद होण्याच्या वेळा लोकसभा मतदारसंघानुसार भिन्न असू शकतात.

2... ओदिशा विधानसभेच्या 42 विधानसभा मतदारसंघात (सर्वसाधारण =27; अनुसूचित जमाती =06; अनुसूचित जाती =09) देखील याच वेळी मतदान होणार आहे.

3...सुमारे 10.9 लाख मतदान अधिकारी 1.09 लाख मतदान केंद्रांवर 10.06 कोटी मतदारांचे स्वागत करतील.

4... सुमारे 10.06 कोटी मतदार या टप्प्यात मतदान करणार असून यापैकी 5.24 कोटी पुरुष मतदार;  4.82 कोटी महिला मतदार तर 3574 तृतीयपंथी मतदार आहेत.

5... 85 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे मतदार आणि दिव्यांग मतदार यांच्यासाठी पर्यायी गृह मतदान सुविधा उपलब्ध आहे.

6... 13 विशेष गाड्या आणि 8 हेलिकॉप्टर (हिमाचल प्रदेशसाठी) मतदान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.

7... 172 निरीक्षक (64 सामान्य निरीक्षक, 32 पोलीस निरीक्षक, 76 व्यय  निरीक्षक) मतदानाच्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत.  हे निरिक्षक अत्यंत दक्ष राहून आयोगाचे डोळे आणि कान म्हणून काम करत आहेत.  याव्यतिरिक्त, काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.

8... मतदारांना दिल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनावर  काटेकोरपणे लक्ष ठेवत त्वरीत पाऊले उचलता यावीत यासाठी एकूण 2707 भरारी पथके, 2799 सांख्यिकी निरीक्षण पथक, 1080 देखरेख  ठेवणारी पथके आणि 560 व्हिडिओ निरीक्षण पथके चोवीस तास देखरेख  ठेवत आहेत.

9...एकूण 201 आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके आणि 906 आंतरराज्य सीमा तपासणी नाके मद्य, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तूंच्या कोणत्याही प्रकारच्या अवैध वाहतूकीवर कडक नजर ठेवत आहेत. सागरी आणि हवाई मार्गांवर कडक देखरेख ठेवण्यात आली आहे.

10...वृद्ध आणि दिव्यांग मतदार व्यक्तींना  सुलभतेने मतदान करण्याच्या दृष्टीने पाणी, सावली, स्वच्छतागृह , रॅम्प, स्वयंसेवक, चाकाची खुर्ची आणि वीज यांसारख्या किमान सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.

11...सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदार माहिती पावतीचे वाटप करण्यात आले आहे. या पावत्या एक सोयीच्या आणि मतदान करण्याचे आमंत्रण म्हणूनही काम करतात.पण मतदानासाठी या पावत्या बंधनकारक नाही.

12...https://electoralsearch.eci.gov.in/ या लिंकद्वारे मतदार त्यांचे मतदान केंद्र तपशील आणि मतदानाची तारीख तपासू शकतात.

13...मतदान केंद्रांवर ओळख पडताळणीसाठी आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त 12 पर्यायी कागदपत्रे देखील मान्य केली आहेत. मतदार यादीत मतदार नोंदणीकृत असल्यास, यापैकी कोणतेही कागदपत्र दाखवून मतदान करता येते. पर्यायी ओळख दस्तऐवजांसाठी निवडणूक आयोगाच्या  आदेशाची लिंक:    https://tinyurl.com/43thfhm9

14...सहाव्या  टप्प्यासाठी संसदीय मतदारसंघनिहाय मतदार प्रेस नोट क्र. 109 दिनांक 28.05 मे 2024

लिंक: https://tinyurl.com/2zxn25st

 

15...लोकसभा 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील मतदानाचा डेटा खालील लिंकवर उपलब्ध आहे:  https://old.eci.gov.in/files/file/13579-13-pc-wise-voters-turn-out/

16... मतदान ॲप प्रत्येक टप्प्यातील एकूण अंदाजे मतदान दर्शविते.  हे लक्षात घेण्यासारखे आहे की टप्पानिहाय/राज्यनिहाय/विधानसभा मतदारसंघ निहाय/लोकसभा मतदारसंघ निहाय अंदाजे मतदानाची  दर दोन तासांनी अद्ययावत आकडेवारी डेटा व्होटर टर्न आउट ॲपवर मतदानाच्या दिवशी उपलब्ध राहील.

17...मतदान आकडेवारी - टप्प्यानुसार, राज्यानुसार, संसदीय मतदारसंघनिहाय (त्या लोकसभा मतदारसंघातील  विधानसभा मतदारसंघातील मतदानासह) व्होटर टर्न आउट ॲपवर पाहता येईल  जी  खालील लिंकवरून डाउनलोड करता येईल:

Android:https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN&pli=1 

iOS: https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882 

***

N.Chitale/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022285) Visitor Counter : 306