माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारत 77 व्या कान चित्रपट महोत्सवात (14 -25 मे) होणार सहभागी
77 व्या कान चित्रपट महोत्सवात साजरे होणार ‘भारत पर्व’.
'क्रिएट इन इंडिया' च्या या वर्षाच्या संकल्पनेचे प्रदर्शन करण्यासाठी 'द सूत्रधारा' द्वारे प्रेरित भारतीय दालनाची एनआयडी, अहमदाबादकडून संरचना
महोत्सवाच्या स्पर्धा विभागात 30 वर्षांनंतर पायल कपाडियाचा ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ हा भारतीय चित्रपट दाखल.
महोत्सवात प्रदर्शित होणार 55 व्या इफ्फीचे पोस्टर आणि ट्रेलर , तसेच नोव्हेंबर 2024 मधील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी “सेव्ह द डेट” चे होणार प्रकाशन
Posted On:
10 MAY 2024 1:08PM by PIB Mumbai
कान चित्रपट महोत्सवात भारतासाठी हे विशेष वर्ष असून देश या प्रतिष्ठेच्या 77 व्या महोत्सवासाठी सज्ज आहे. कॉर्पोरेट भारतीय प्रतिनिधीमंडळात भारत सरकार, राज्य सरकारे आणि चित्रपट उद्योग यातील प्रतिनिधींचा समावेश आहे. हे प्रतिनिधीमंडळ जगातील आघाडीच्या चित्रपट बाजारपेठांपैकी एक असलेल्या मार्चे डू फिल्म्समध्ये, भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था चित्रपट उद्योगातील महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या मालिकेद्वारे प्रदर्शित करेल.
77 व्या कान चित्रपट महोत्सवात देश प्रथमच “भारत पर्व” आयोजित करणार आहे. यामध्ये जगभरातील नामवंत मान्यवर आणि प्रतिनिधी, चित्रपट तारे, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, निर्माते यांच्यासोबत जगभरातील खरेदीदार आणि विक्री एजंट सहभागी होऊन असंख्य सर्जनशील संधी आणि सर्जनशील प्रतिभेचा समृद्ध ठेवा प्रदर्शित करणार आहेत. गोव्यात 20-28 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी IFFI) अधिकृत पोस्टर आणि ट्रेलरचे अनावरण ‘भारत पर्व’ मध्ये केले जाणार आहे. 55 व्या इफ्फीसोबत आयोजित केल्या जाणाऱ्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेसाठी (WAVES) “सेव्ह द डेट” चे प्रकाशन देखील भारत पर्वमध्ये होणार आहे.
77 व्या कान चित्रपट महोत्सवामधील भारतीय दालनाचे उद्घाटन 108 व्हिलेज इंटरनॅशनल रिव्हिएरा येथे 15 मे रोजी प्रसिद्ध चित्रपट व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे. कान येथील भारतीय दालन हे भारतीय चित्रपट समुदायाला विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून देणारे एक व्यासपीठ म्हणून काम करते. हे व्यासपीठ उत्पादन सहयोग वाढवणे, निवडक विषयावरील ज्ञान सत्र, वितरण सौद्यांवर स्वाक्षरी करणे, पटकथांना हिरवा कंदील दाखवणे, एकामागोमाग बैठका आणि जगभरातील प्रमुख मनोरंजन आणि प्रसार माध्यम घटकांबरोबर संपर्क वाढवणे अशा कामात मदत करणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की FICCI) च्या सहकार्याने या दालनाचे आयोजन केले जाणार आहे. चित्रपट उद्योगांना जोडण्यासाठी आणि सहयोग करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII-भारतीय उद्योग महासंघ ) च्या माध्यमातून मार्चे डू कान्समध्ये ‘भारत स्टॉल’ आयोजित केला जाणार आहे.
भारत दालनाची रचना अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईन या संस्थेने केली आहे. या दालनाचे नाव 'द सूत्रधारा' असे असून यात वर्षीच्या "क्रिएट इन इंडिया" या संकल्पनेचे प्रदर्शन करण्यात आले आहे. कान चित्रपट महोत्सवातील भारताच्या उपस्थितीमुळे, यंदा समृद्ध इतिहास आणि सृजनशीलतेचा परिप्रेक्ष आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर साकारणार आहे.
महोत्सवातील विशेष आकर्षण असलेली, पायल कपाडिया यांची "ऑल वी इमॅजिन ॲज लाइट," ही अप्रतिम कलाकृती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आणि प्रतिष्ठेच्या ‘पाल्म डी'ओर’ पुरस्कारावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे, तीन दशकांनंतर, कान चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत निवड स्पर्धा विभागात भारतीय चित्रपटाने मानाचे स्थान मिळवले असून, हा एक महत्वाचा टप्पा आहे. ब्रिटीश-भारतीय चित्रपट निर्मात्या संध्या सुरी यांच्या "संतोष" मधील मार्मिक कथन, करण कंधारी यांच्या डायरेक्टर्स फोर्टनाइट मधील "सिस्टर मिडनाईट" आणि L’Acid (स्वतंत्र चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय वितरकांच्या संघटनेने निवडलेले चित्रपट) मधील मैसम अली यांच्या "इन रिट्रीट" मुळे सिनेमाचा अवकाश आणखी समृद्ध झाला आहे.
भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (FTII) विद्यार्थ्यांनी बनवलेल्या "SUNFLOWERS WERE FIRST ONES TO KNOW" या चित्रपटाची ‘ला सिनेफ’ स्पर्धात्मक विभागात निवड झाली आहे. कन्नड भाषेतील लघुपटाची जगभरातून आलेल्या प्रवेशिकांमधून निवड झाली आहे. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात या चित्रपटाची इतर 17 आंतरराष्ट्रीय लघुपटांशी स्पर्धा होईल. त्याशिवाय, श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’ हा अमूल डेअरी सहकारी चळवळीवर प्रकाश टाकणारा चित्रपट, क्लासिक्स विभागात दाखवला जाईल, जो महोत्सवातील भारताच्या सादरीकरणाला ऐतिहासिक महत्त्व देईल. एनएफडीसी-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय- एनएफएआय) च्या फिल्म व्हॉल्टमध्ये अनेक दशके या चित्रपटाची रिळे जतन करण्यात आली होती, आणि फिल्म हेरिटेज फाउंडेशन (FHM) द्वारे हा चित्रपट पुनर्संचयित करण्यात आला.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन हे कान चित्रपट महोत्सवातल्या प्रतिष्ठेच्या पियरे अँजेनीक्स सन्मानाचे मानकरी ठरतील. हा सन्मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय असून, महोत्सवात सहभागी होणार्या प्रतिनिधींसाठी तो आदर्श ठरेल.
गोवा, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, झारखंड आणि दिल्लीसह भारतातील अनेक राज्ये महोत्सवात सहभागी होणार असून भारतातील वैविध्यपूर्ण ठिकाणे आणि चित्रपट क्षेत्रातील प्रतिभा प्रदर्शित करण्यामध्ये हातभार लावतील.
भारताच्या सहकार्याने चित्रपट निर्मितीच्या संधी शोधण्यावरील, "भरपूर प्रोत्साहन आणि अखंड सुविधा - या, भारतात चित्रपट निर्मिती करा" या विषयावरील सत्र 15 मे रोजी दुपारी 12 वाजता मुख्य व्यासपीठावर (रिव्हिएरा) आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आयोजित पॅनेल चर्चेमध्ये भारतात चित्रपट निर्मितीसाठी मिळणारे मोठे प्रोत्साहन, सह-निर्मितीच्या संधी आणि उत्कृष्ट पोस्ट-प्रॉडक्शन सुविधांवर भर देण्यात येईल. या उपक्रमाला चित्रपट निर्मात्यांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, भारतात चित्रपट बनवताना त्यांना आलेला अनुभव आणि त्याच्याशी संबंधित रोमांचक कथा याचे यावेळी आदान-प्रदान होईल.
महोत्सवातील भारत पॅव्हेलियनमधील परस्परसंवादी सत्रांमध्ये भारतात चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन, चित्रपट महोत्सवांमध्ये आंतरराष्ट्रीय सहयोग, चित्रीकरणाचे ठिकाण म्हणून भारत, भारताची स्पेन, यूके आणि फ्रान्स, यासारख्या इतर देशांबरोबर द्विपक्षीय चित्रपट सह-निर्मिती यासारख्या विषयांचा समावेश असेल. जगभरात आपला ठसा उमटवणारा भारतीय चित्रपट उद्योग आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांबरोबर काम करू इच्छिणाऱ्या चित्रपट निर्मात्यांसाठी चर्चा, नेटवर्किंग आणि सहयोगाच्या संधी उपलब्ध करणे, हे या सत्रांचे उद्दिष्ट आहे.
***
S.Kakade/S.Mukhedkar/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2020221)
Visitor Counter : 236
Read this release in:
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
Odia
,
English
,
Khasi
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu