अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"भाड्याची घरे, किंवा झोपडपट्ट्या, किंवा चाळी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या" मध्यमवर्गीय वर्गांतील पात्र लोकांना त्यांचे स्वतःचे घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मदत करण्यासाठी केंद्र सरकार योजना सुरू करणार


पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सरकार 3 कोटी घरांचे उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ आहे

कुटुंबांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे उद्भवणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढील 5 वर्षात आणखी 2 कोटी घरे बांधण्यात येणार

प्रविष्टि तिथि: 01 FEB 2024 3:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 1 फेब्रुवारी 2024

आज संसदेत 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की, "भाड्याची घरे, झोपडपट्ट्या, किंवा चाळी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या" मध्यमवर्गातील पात्र लोकांना स्वतःचे घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मदत करण्यासाठी सरकार एक योजना सुरू करेल.

पंतप्रधान आवास योजनेच्या (ग्रामीण) यशाचा उल्लेख करत केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या की, कोविड काळात आव्हाने असतानाही, योजनेची अंमलबजावणी सुरूच राहिली आणि आता सरकार तीन कोटी घरांचे उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ आहे. त्या म्हणाल्या की कुटुंबांची संख्या वाढल्यामुळे उद्भवणारी  गरज पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्षांत आणखी दोन कोटी घरे बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल.

केंद्र सरकार 2047 पर्यंत भारताला 'विकसित भारत' बनवण्यासाठी सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत आहे यावर निर्मला सीतारामन यांनी भर दिला.

 

M.Iyengar/S.Kane/P.Malandkar


(रिलीज़ आईडी: 2001347) आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Nepali , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam