पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

Posted On: 03 JAN 2024 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 3 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी एक्स वरील संदेशात म्हटले आहे:

"लक्षद्वीपमधील केन्द्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून आनंद झाला. महिलांच्या एका गटाने त्यांच्या स्वयंसहाय्यता गटाने उपाहारगृह सुरू करण्याच्या दिशेने कसे काम केले, कशा प्रकारे त्या स्वावलंबी झाल्या याबद्दल सांगितले; एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की आयुष्मान भारतमुळे, हृदयविकारावर उपचार करण्यात कशी मदत झाली. आणि पीएम-किसानमुळे एका महिला शेतकऱ्याचे जीवन कसे बदलले. इतरांनी मोफत रेशन, दिव्यांगांसाठी लाभ, पीएम-आवास, किसान क्रेडिट कार्ड, उज्ज्वला योजना आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा केली. विकासाची फळे अगदी दुर्गम भागातही वेगवेगळ्या वर्गातील लोकांपर्यंत पोहोचताना पाहणे खरोखरच समाधानकारक आहे".

N.Meshram/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1992694) Visitor Counter : 149