पंतप्रधान कार्यालय

प्रत्येकाने व्होकल फॉर लोकल होण्याचे आणि भारताच्या प्रगतीला चालना देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Posted On: 10 NOV 2023 3:02PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाने व्होकल फॉर लोकल व्हावे आणि भारताच्या प्रगतीला चालना द्यावी, असे आवाहन केले आहे. 140 कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रमांचे महत्त्व देखील मोदी यांनी विचारात घेतले आहे आणि ते म्हणाले की उद्यमशील लोकांची सृजनशीलता आणि अथक भावना यामागे आहे ज्यामुळे आपण व्होकल फॉर लोकल होऊ शकतो आणि भारताच्या प्रगतीला चालना देऊ शकतो. 

किरण मझुमदार शॉ यांच्या एक्स वरील पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले;

खरंच, आपण ही दिवाळी 140 कोटी भारतीयांच्या कष्टाविषयीची बनवूया. उद्यमशील लोकांची सृजनशीलता आणि अथक भावना यामागे आहे ज्यामुळे आपण #VocalForLocal होऊ शकतो आणि भारताच्या प्रगतीला चालना देऊ शकतो.  या सणात आत्मनिर्भर भारताचा नारा घुमू दे!

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976157) Visitor Counter : 69