गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जलदिवाळी - "स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया" अभियानाचा प्रारंभ


जल प्रशासनामध्ये महिलांचा समावेश करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे

या मोहिमेअंतर्गत 550 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांना स्वमदत गट भेटी देणार

Posted On: 06 NOV 2023 11:57AM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA)"अमृत (अटल मिशन फॉर रिजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन,AMRUT)"या मोहिमेअंतर्गत मंत्रालयाच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान ( दीनदयाळ अंत्योदय योजना,NULM), यांच्या सहकार्याने "स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया, या प्रगतीशील उपक्रमचा आरंभ करण्यासाठी सज्ज झाले आहे. ओडिशा अर्बन अकादमी हा या मोहिमेसाठी ज्ञान सहकार्य करणार आहे. ही मोहीमेद्वारे "जल दिवाळी" साजरी करण्यात येणार आहे. ही मोहीम दिनांक 7 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होऊन 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.

जलप्रशासनात महिलांचा समावेश करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. यावेळी महिलांना त्या रहात असलेल्या शहरांमधील जल प्रक्रिया प्रकल्पांना (WTPs) भेटी देऊन जलशुद्धीकरण प्रक्रियेची प्राथमिक माहिती दिली जाईल.नागरिकांना उत्तम दर्जाचे पाणी मिळेल याची खात्री देणाऱ्या  स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या महत्त्वाच्या प्रक्रियेची माहिती या भेटींमधून महिलांना दिली जाईल. याव्यतिरिक्त, महिलांना पाणी गुणवत्ता चाचणीच्या प्रक्रियेची माहिती देखील मिळेल.पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्ये स्वमालकी आणि  स्वत्वाची भावना निर्माण करणे हे या मोहिमेचे प्रमुख आणि व्यापक उद्दिष्ट आहे.

भारतात 65,000 MLD पेक्षा जास्त जल प्रक्रिया क्षमता असलेले रचनात्मक आणि 55,000 MLD पेक्षा जास्त कार्यक्षम असलेले 3,000 पेक्षा जास्त जलशुद्धीकरण प्रक्रिया क्षमता प्रकल्प आहेत. या मोहिमेदरम्यान, महिला बचत गट (SHGs) 20,000 MLD पेक्षा जास्त (देशातील एकूण 35% पेक्षा जास्त)क्षमता असलेल्या 550 हून अधिक जलशुद्धीकरण प्रकल्पांना भेट देतील.

घरातील पाणी व्यवस्थापनात महिलांचा महत्वपूर्ण वाटा असतो. महिलांना जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांबद्दलचे ज्ञान देऊन त्यांचे सक्षमीकरण करून, घरांसाठी सुरक्षित आणि शुद्ध पाणी मिळवणे सुनिश्चित करण्यासाठी त्यांची क्षमता वाढवणे हे  मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुरुषांचे पारंपारिक वर्चस्व असलेल्या सर्वच क्षेत्रांमध्ये समावेशकता आणि विविधतेला प्रोत्साहन देऊन लिंगभाव समानतेच्या समस्यांचे निराकरण करणे आहे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

"स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया "हे  अभियान", "जल दिवाळी" या उपक्रमांच्या पहिला टप्प्यात सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील (प्रारुप आचारसंहितेतील 5 राज्ये वगळता) 15,000 पेक्षा जास्त  स्वमदत गटातील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे, देशभरात.

मोहिमेने निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये या  पुढील बाबी समाविष्ट आहेत:

1.महिलांना जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणी गुणवत्ता चाचणी या सुविधांच्या कामकाजाची ओळख करून देणे‌

2.महिला बचत गटांच्या कार्याच्या समावेषकतेला आणि सहभागाला पुरस्कार आणि लेखांद्वारे प्रोत्साहन देणे

3.अमृत (AMRUT) योजना आणि त्याचा पाण्याच्या पायाभूत सुविधांवर होणारा परिणाम याविषयी महिलांना परिचित करून त्यांना शिक्षित करणे

जलप्रक्रियेच्या, हक्कांची आणि जबाबदारीची जाणीव, सर्वसमावेशकतेला चालना, स्वयंसहाय्यता गटांचे सक्षमीकरण, सकारात्मक समुदाय प्रभाव आणि भविष्यातील उपक्रमांचे प्रारुप याविषयी जागरूकता आणि ज्ञान वाढवणे यांचा समावेश या मोहिमेच्या  यशस्वीततेच्या अपेक्षित उद्दिष्टांमध्ये होतो.

अमृत आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका विभागांतील राज्य आणि शहरांतील अधिकारी  हे  जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या  या भेटींची व्यवस्था करतील.गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने पाण्याच्या संदर्भातील मूलभूत सुविधांसाठी महत्त्वाच्या बाबींमध्ये  महिलांचा समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या या उपक्रमात सर्व राज्य आणि शहरातील अधिकार्‍यांना  सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि समर्थन देण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे. 

***

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975022) Visitor Counter : 214