पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

15 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या अत्युत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला

Posted On: 02 NOV 2023 9:25PM by PIB Mumbai

15 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघाने 55 पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात;
“अत्यंत अतुलनीय यश!
15 व्या @Asian_Shooting स्पर्धेत आपल्या नेमबाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन.
आपल्या खेळाडूंनी 21 सुवर्णपदकांसह एकूण 55 पदकांची कमाई तसेच 6 @Paris2024 कोटा देखील मिळवला आहे.
त्यांचे कौशल्य, निर्धार आणि अदम्य उर्जा यांचा देशाला खरोखरीच अभिमान वाटतो आहे.”

***

SonalT/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1974386) Visitor Counter : 101