पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरी बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी नितेश कुमार, तरुण धिल्लन यांचे केले अभिनंदन

Posted On: 27 OCT 2023 8:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुष दुहेरी बॅडमिंटन SL3-SL4 मध्ये सुवर्णपदक पटकावल्याबद्दल नितेश कुमार आणि तरुण धिल्लन यांचे अभिनंदन केले.

उदयोन्मुख   खेळाडूंसाठी हे एक उज्ज्वल उदाहरण ठरले आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्या सांघिक कामगिरीचेही कौतुक केले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"बॅडमिंटन - पुरुष दुहेरी SL3-SL4 मधील शानदार सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नितेश कुमार आणि तरुण धिल्लन यांचे अभिनंदन. त्यांच्या सांघिक कामगिरीने आणि प्रतिभेने उदयोन्मुख   खेळाडूंसाठी एक उज्ज्वल उदाहरण ठेवले आहे. भारताला त्यांचा सार्थ अभिमान आहे."

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972237) Visitor Counter : 80