पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये मिश्र 50 मीटर रायफल्स प्रोन SH-1 स्पर्धेत सिद्धार्थ बाबू यांनी सुवर्णपदक मिळविल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 26 OCT 2023 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023

चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये मिश्र 50 मीटर रायफल्स प्रोन SH-1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सिद्धार्थ बाबू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

एक्स वरिल आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:

मिश्र 50 मीटर रायफल्स प्रोन एसएच-1 स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल पॅरा नेमबाज सिद्धार्थ बाबू यांचे अभिनंदन!

हे सुवर्णपदक त्यांच्या अचूकतेचा, एकाग्रतेचा, असाधारण प्रतिभेचा आणि अथक ध्येयासक्तीचा दाखला आहे. भारत हर्षोल्लासित झाला आहे.

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1971396) Visitor Counter : 67