पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पॅरा कॅनोईंग महिला VL2 प्रकारात अंतिम सामन्यात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राची यादवचे अभिनंदन केले.

प्रविष्टि तिथि: 23 OCT 2023 11:22AM by PIB Mumbai

चीनमधील हांगचौ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या चौथ्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पॅरा कॅनोईंग महिला VL2 प्रकारात अंतिम सामन्यात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राची यादवचे अभिनंदन केले.

 "आशियाई पॅरा क्रीडास्पर्धेत पहिले पदक जिंकून प्राची यादवने भारतीय क्रीडसृष्टीच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे.

 पॅरा कॅनोईंग महिला VL2 प्रकारात संस्मरणीय रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्राची यादवचे अभिनंदन.

 तिच्या या अतुलनीय कामगिरीने संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. "

असे पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर लिहिले आहे.

***

SonalT/BhaktiS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1970017) आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada