पंतप्रधान कार्यालय
'मन की बात' वर अनेक लोकांनी विस्तृत संशोधन केले, आपले अभ्यासपूर्ण निष्कर्ष इतरांसोबत सामायिक केले : पंतप्रधान
Posted On:
21 OCT 2023 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2023
'मन की बात' या दर महिन्याला आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या आपल्या कार्यक्रमावर अनेक लोकांनी विस्तृत संशोधन केल्याबाद्दल आणि आपले अभ्यासपूर्ण निष्कर्ष इतरांसोबत सामायिक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाधान व्यक्त केले.
त्यांनी ‘इग्नाइटिंग कलेक्टिव्ह गुडनेस’ या पुस्तकाचा उल्लेख केला असून या पुस्तकात ‘मन की बात’ हे सामाजिक परिवर्तनाचे साधन कसे बनले, याचे वर्णन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"अनेक लोकांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये ‘मन की बात’वर व्यापक संशोधन केले आहे आणि त्यांचे अभ्यासपूर्ण निष्कर्ष लोकांसोबत सामायिक केले, याबद्दल मला आनंद वाटतो. असाच आणखी एक प्रयत्न म्हणजे ब्लूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशनचे 'इग्नाइटिंग कलेक्टिव्ह गुडनेस' हे पुस्तक आहे. यामध्ये हा कार्यक्रम सामाजिक परिवर्तनाचे कसे साधन बनला, याचे वर्णन केले आहे. या कार्यासाठी त्यांचे अभिनंदन. mkb100book.in''
* * *
M.Pange/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1969815)
अभ्यागत कक्ष : 180
Read this releasein:
Bengali
,
Telugu
,
Malayalam
,
हिन्दी
,
Punjabi
,
English
,
Urdu
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Odia
,
Tamil
,
Kannada