सांस्कृतिक मंत्रालय
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या ‘वीरांच्या सन्मानार्थ सुरु करण्यात आलेल्या देशव्यापी ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात
या मोहिमेअंतर्गत देशभरातील 4419 पेक्षा जास्त ब्लॉक्समध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाप्रीत्यर्थ कर्तव्य पथावरील अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारक येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून संकलित करण्यात आलेली माती समारंभपूर्वक ठेवण्यात येणार
Posted On:
17 OCT 2023 12:04PM by PIB Mumbai
देशभरातील अमृत कलशांच्या यात्रांसह आता “मेरी माटी मेरा देश” (एमएमएमडी) ही मोहीम शेवटच्या टप्प्यावर आली आहे. संपूर्ण देशभर सुरु असलेला हा उपक्रम देशातील घराघरात पोहोचण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आला आहे. हा अत्यंत मह्त्वपूर्ण सहयोगात्मक प्रयत्न करत, विविध मंत्रालये, राज्य सरकारे, नेहरू युवा केंद्र संघटन, क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रे, केंद्रीय सशस्त्र पोलीस दले, भारतीय टपाल विभाग, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. तसेच कोळसा मंत्रालय या सर्वांनी गावागावांतील आणि ब्लॉक्समधील प्रत्येक घरातून मातीचे संकलन करण्याच्या ऐतिहासिक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवला. या सर्वांनी राबवलेला हा संयुक्त उपक्रम, समाज सेवा आणि देश उभारणीप्रती त्यांची वचनबद्धता दर्शवत, हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्याप्रती त्यांची कटिबद्धता अधोरेखित करतो. सदर मोहिमेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच त्याची माहिती अधिक चांगल्या प्रकारे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाची क्षेत्रीय केंद्रे देशभरात विविध सांकृतिक कार्यक्रम आयोजित करत आहे. आतापर्यंत देशातील 4419 पेक्षा जास्त ब्लॉक्समध्ये मेरी माटी मेरा देश मोहिमेअंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यांना जनसामान्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
मंड्या येथे मेरी माती मेरा देश तालुका पातळीवर आयोजित कार्यक्रम
कंदांना ब्लॉक, गुजरात
कुमटा, कारवार
आसाम रायफल्सच्या जवानांनी अरुणाचल प्रदेशात लाँगडिंग जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे कलश दिला. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या धाडसी ‘वीरां’चा गौरव करण्याच्या उद्देशाने 9 ऑगस्ट 2023 रोजी “मेरी माटी मेरा देश” ही देशव्यापी मोहीम सुरु करण्यात आली. या अमृतमहोत्सवी सोहोळ्यात देशभरात आयोजित 200,000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन नागरिकांनी भव्य लोकसहभागाचे दर्शन घडवले. मेरी माटी मेरा देश मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लोकांपर्यंत विस्तृत प्रमाणात पोहोच आणि जनतेच्या लक्षणीय सहभागातून उल्लेखनीय यश मिळवले. आतापर्यंत, देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2,33,000 शिळाफलक उभारण्यात आले आहेत. तसेच संबंधित संकेतस्थळावर पंच निर्धारांच्या प्रतिज्ञेसह सुमारे 40 दशलक्ष सेल्फी फोटो अपलोड करण्यात आले आहेत. या मोहिमेच्या अंमलबजावणीतून, देशभरातील शूरवीरांचा गौरव करण्यासाठी 200,000 हून अधिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले आहेत. वसुधा वंदन संकल्पनेअंतर्गत 236 दशलक्षांहून अधिक स्वदेशी रोपट्यांची लागवड करण्यात आली असून 263,000 अमृत वाटिका उभारण्यात आल्या आहेत.
देशभरातून दिल्लीत येणाऱ्या अमृत कलश यात्रांचा येत्या 30 आणि 31 ऑक्टोबर 2023 रोजी कर्तव्य पथावर आयोजित भव्य समारंभात समारोप होईल. देशव्यापी उपक्रमाच्या या भव्य समारोपाच्या प्रसंगी, आपल्या देशाची एकता आणि विविधता यांचे प्रतीक असणारे हे ऐतिहासिक कलश देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मातीशी मिश्रित करण्यासाठी ठेवले जातील आणि त्यानंतर अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारक येथे या कलशांची समारंभपूर्वक स्थापना केली जाईल. या अत्युत्कृष्ट समारंभाला विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चित्ताकर्षक प्रकाश आणि ध्वनीच्या खेळांची जोड दिली जाईल. विशेष पद्धतीने रचलेले अनुभवात्मक विभाग, सहभागींना या ऐतिहासिक मोहिमेविषयी महत्त्वाची माहिती देतील. हे विभाग देशाच्या सामुहिक प्रेरणेची प्रशंसा करतानाच, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सन्मान करण्यासाठी गहन तसेच चिरकाल टाकणारा वारसा निर्माण करतील.
***
S.Tupe/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1968427)
Visitor Counter : 151
Read this release in:
Urdu
,
Malayalam
,
English
,
Khasi
,
Hindi
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada