पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधानांनी अशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये तिरंदाजीतील कंपाऊड प्रकारात महिला संघाने मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल केले कौतुक

Posted On: 05 OCT 2023 3:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023

होंगझू येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिला तिरंदाजी कंपाऊंड  प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्योती सुरेखा वेण्णम, परनीत कौर आणि आदिती गोपीचंद यांचे अभिनंदन केले आहे.

भारतीय महिला तिरंदाजांनी कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकले! ज्योती सुरेखा वेण्णम, परनीत कौर आणि आदिती गोपीचंद यांचे अभिनंदन! त्यांची निर्दोष कामगिरी, एकाग्रता आणि समर्पण याचा आपल्या देशाला विशेष अभिमान आहे. हे यश म्हणजे  त्यांचे  अतुलनीय कौशल्य आणि टीमवर्क याचे निदर्शक आहे.असे पंतप्रधानांनी आपल्या एक्स वरिल संदेशात म्हटले आहे,

 

N.Meshram/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964620) Visitor Counter : 103