पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या स्पीड स्केटिंग 3000 मीटर रिले स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 02 OCT 2023 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑक्‍टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंदकुमार वेलकुमार, सिद्धांत राहुल कांबळे आणि विक्रम राजेंद्र इंगळे यांचे  आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष स्पीड स्केटिंग 3000 मीटर रिले प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“सांघिक कार्याचे अविश्वसनीय प्रदर्शन करत देशासाठी आणखी एका कांस्य पदकाची कमाई!

आनंदकुमार वेलकुमार, सिद्धांत राहुल कांबळे, विक्रम राजेंद्र इंगळे यांनी पुरुष स्पीड स्केटिंग 3000 मीटर रिले स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.

या प्रदर्शनामुळे देशाला खूप आनंद झाला असून या कामगिरीचा देशाला खूप अभिमान आहे!”

 

* * *

NM/V.Yadave/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1963223) Visitor Counter : 93