पंतप्रधान कार्यालय
स्वच्छता मोहिमेत पंतप्रधान सहभागी
फिटनेस इन्फ्लुएन्सर अंकित बैयनपुरिया देखील या उपक्रमात पंतप्रधानांबरोबर सहभागी
प्रविष्टि तिथि:
01 OCT 2023 2:31PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज संपूर्ण देश स्वच्छता मोहीमेत सहभागी होत आहे. प्रत्येकाने स्वच्छतेसाठी एक तास समर्पित केला आहे जो देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यात मदत करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंकित बैयनपुरिया यांच्यासह या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. अंकित हा फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे.
पंतप्रधानांनी त्यांच्या X पोस्टवर एक व्हिडिओ सामायिक केला आहे ज्यामध्ये ते आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छता आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल सांगताना दिसतात. पंतप्रधानांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील दिनचर्येबद्दलही सांगितले आणि अंकितच्या तंदुरुस्तीसंबंधी सूचनाही जाणून घेतल्या.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“आज, ज्याप्रमाणे देश स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करत आहे, अंकित बैयनपुरिया आणि मी देखील तेच केले! स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन आम्ही तंदुरुस्ती आणि निरामय आरोग्य याबाबतही बोललो. हे सर्व त्या स्वच्छ आणि निरोगी भारतासाठी आहे! @baiyanpuria"
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962728)
आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam