पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 25 मीटर पिस्तूल क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवणाऱ्या महिला संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2023 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023
हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 25 मीटर पिस्तूल क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मनू भाकर, रिदम सांगवान आणि ईशा सिंग या महिला चमूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले:
“भारतासाठी एक अद्वितीय सुवर्ण पदक".
मनू भाकर, रिदम सांगवान आणि ईशा सिंग यांचा समावेश असलेल्या महिला संघाचे 25 मीटर पिस्तूल प्रकारातील त्यांच्या नेत्रदीपक विजयाबद्दल अभिनंदन!
त्यांच्या उल्लेखनीय सांघिक कामगिरीचे हे उत्कृष्ट फळ मिळाले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1961339)
आगंतुक पटल : 144
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam