पंतप्रधान कार्यालय

जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट उपक्रमाच्या अंतिम सत्रात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी युवा वर्गाला केले आमंत्रित


याबाबत त्यांनी सामायिक केली  एक लिंक्डइन पोस्ट

Posted On: 24 SEP 2023 8:43PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक युवतींना  26 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट या उपक्रमाच्या अंतिम सत्रात भाग घेण्याचे आवाहन केले  आहे.

त्यांनी "जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट - आपल्या युवा शक्तीला प्रोत्साहन" या शीर्षकाची लिंक्डइन पोस्ट देखील सामायिक केली  आहे.

श्री मोदींनी X समाजमाध्यमा वर म्हटले आहे:

"माझ्या तरुण मित्र,-मैत्रिणींनो,

या महिन्याच्या 26 तारखेला होणाऱ्या जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट उपक्रमाच्या अंतिम सत्रात  तुम्ही भाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे.  गेल्या वर्षभरात, जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम, भारताच्या जी-20 अध्यक्षपदा अंतर्गत लक्ष केंद्रित केलेल्या प्राधान्य क्षेत्रांवर प्रकाश टाकण्यासाठी एक उत्तम मंच म्हणून उदयास आला आहे.

या निमित्ताने वैविध्यपूर्ण मुद्द्यांवर विचारांची जोरदार देवाणघेवाण करण्यासाठी मी उत्सुक आहे.

https://www.linkedin.com/pulse/g20-university-connect-encouraging-our-yuva-shakti-narendra-modi/?published=t. ""

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1960231) Visitor Counter : 78