पंतप्रधान कार्यालय

भारत मंडपम येथील नटराज पुतळा भारताची प्राचीन कलात्मकता आणि परंपरांची साक्ष देईल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Posted On: 06 SEP 2023 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2023

 

भारत मंडपम येथील भव्य नटराज पुतळा भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची साक्ष देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने एक्सवर प्रसारित केलेली पोस्ट शेअर करून पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“भारत मंडपम येथील भव्य नटराज पुतळा भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची महती प्रदर्शित करतो. G20 परिषदेसाठी जगभरातले नेते इथे  एकत्र येत असताना  हा पुतळा भारताची पुरातन कलात्मकता आणि परंपरांची  साक्ष देईल.”

 

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1955091) Visitor Counter : 173