पंतप्रधान कार्यालय

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था आशेच्या किरणासमान चमकत आहे : पंतप्रधान

Posted On: 19 AUG 2023 6:42PM by PIB Mumbai

 

भारतासाठी असलेल्या आशादायी चित्रामागच्या कारणांचे विवेचन करणारे मनीकंट्रोल या वेबसाईट वरील लेख आणि इन्फोग्राफीकचे संकलन यावरील ट्वीटला प्रतिसाद देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत वृद्धीविषयी आणि संकटकाळातही चिवटपणे उभे राहण्याऱ्या वृत्तीविषयी पुन्हा एका निर्धार व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:

"जगातील आव्हानात्मक परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था आशेच्या किरणासमान चमकत आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची मजबूत वृद्धी आणि चिवट वृत्ती, यामुळे, आपले भविष्य उज्ज्वल दिसते आहे. ही गती पुढेही कायम ठेवूया आणि 140 कोटी भारतीयांची समृद्धी सुनिश्चित करूया.

***

M.Pange/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950489) Visitor Counter : 112