पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पुरातन कलात्मक वस्तू परत केल्याबद्दल पंतप्रधानांनी अमेरिकेचे मानले आभार

Posted On: 19 JUL 2023 12:43PM by PIB Mumbai

भारतातील विविध प्रदेश आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  पुरातन  कलात्मक 105 वस्तू  अमेरिकेहून मायदेशी परत आणण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे यासंदर्भात आभार मानले आहेत. या 105 पुरातन वस्तू भारतातील  प्रदेश आणि परंपरांचे वैविध्‍य  दर्शविणा-या आहेत.

वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाने केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

“यामुळे प्रत्येक भारतीयाला आनंद होईल. याबद्दल अमेरिकेचे खूप  आभार. या मौल्यवान कलाकृतींना सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व खूप आहे.  या वस्‍तू भारताला परत मिळण्‍याची घटना,  आमचा वारसा आणि समृद्ध इतिहास जतन करण्याच्या आमच्या वचनबद्धतेच्या बांधिलकीशी  निगडित आहे.”

***

सुवर्णा बेडेकर/ संपदा पाटगावकर/सी .यादव

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1940673) Visitor Counter : 152