पंतप्रधान कार्यालय

ब्रिजवॉटर असोसिएट्सचे सह संस्थापक रे डेलिओ यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

Posted On: 21 JUN 2023 11:40AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2023

 

अमेरिकन गुंतवणूकदार, लेखक आणि हेज फंड, ब्रिजवॉटर असोसिएट्सचे सह संस्थापक, रे डेलिओ यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

डेलिओ यांच्याशी झालेल्या चर्चेत, भारतात आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी, अनुपालने कमी करणे तसेच अनेक कायदेशीर प्रकरणातील फौजदारी कलमे काढून टाकण्यासारख्या केंद्र सरकारच्या निर्णयांची पंतप्रधानांनी माहिती दिली. डेलिओ यांनी भारतात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आमंत्रण पंतप्रधानांनी दिले.

 

* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933888) Visitor Counter : 87