पंतप्रधान कार्यालय

वीस वर्षांखालील 20 व्या आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

Posted On: 09 JUN 2023 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वीस वर्षांखालील गटासाठीच्या 20 व्या आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारतीय खेळाडूंचे कौतुक केले.

पंतप्रधानांनी केलेले ट्विट:

"आपल्या खेळाडूंचा मला अभिमान आहे! त्यांनी वीस वर्षांखालील गटासाठीच्या 20 व्या आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली! या स्पर्धेत 6 सुवर्णांसह भारताने 19 पदके मिळवली आणि भारताने 45 राष्ट्रांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. आपल्या खेळाडूंचा  विजय आपण साजरा करूया आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देऊया"

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1931182) Visitor Counter : 115