पंतप्रधान कार्यालय
नागरिकांनी केलेल्या व्हॉईसओव्हरसह नवीन संसद भवनाचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शेअर
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2023 1:46PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी केलेल्या विनंतीनुसार नागरिकांनी त्यांचे विचार या व्हिडिओत व्हॉईस ओव्हर द्वारे व्यक्त केले आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा व्हॉइस ओव्हर व्हिडिओ देखील पंतप्रधानांनी शेअर केला आहे.
ट्विटर हँडलवरून व्हिडिओ ट्विट करताना पंतप्रधान म्हणाले:
“अनेक लोक #MyParliamentMyPride या संकेतस्थळावर आनंद व्यक्त करत आहेत. अतिशय भावनिक व्हॉईस-ओव्हरद्वारे ते अभिमानाची भावना व्यक्त करत आहेत. आपल्या देशाला संसद भवनाची नवी इमारत मिळत आहे. लोकांच्या आकांक्षा अधिक जोमाने पूर्ण करण्यासाठी संसद काम करत राहील, अशा भावना या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत ”
“लोकशाहीचे हे मंदिर भारताच्या विकासाचा मार्ग बळकट करत राहील आणि लाखो लोकांचे सक्षमीकरण त्याद्वारे होत राहील” #MyParliamentMyPride
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1927700)
आगंतुक पटल : 230
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam