पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने बीएमडी इंटरसेप्टरची यशस्वी चाचणी घेतल्याबद्दल केले कौतुक

Posted On: 24 APR 2023 2:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या तळावर बीएमडी इंटरसेप्टरची (प्रक्षेपी क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता असलेल्या आंतररोधी क्षेपणास्त्राची) यशस्वी चाचणी घेतल्याबद्दल डीआरडीओ आणि भारतीय नौदलाचे कौतुक केले आहे.

भारतीय नौदलाच्या ट्विटवर पंतप्रधानांनी उत्तर दिले,

"आपल्या संरक्षण क्षमता अधिकाधिक बळकट करण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांचे त्यांच्या अविरत प्रयत्नांसाठी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीसाठी अभिनंदन."

 

 

 

 

S.Thakur/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

***



(Release ID: 1919158) Visitor Counter : 138