पंतप्रधान कार्यालय
बेंगळुरूस्थित हृदयरोगतज्ज्ञ आणि त्यांच्या मुलाकडून वस्तूंच्या पुनर्वापरासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून दखल
प्रविष्टि तिथि:
07 MAR 2023 2:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्वापर आणि ‘टाकाऊ पासून संपत्ती’ याविषयी जागरूकता निर्माण केल्याबद्दल बंगळुरू येथील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ दीपक कृष्णमूर्ती आणि त्यांच्या मुलाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
पुनर्वापर आणि ‘टाकाऊ पासून संपत्ती’ याविषयी व्यापक जागरूकता निर्माण करण्यासाठी इतरांनीही असेच प्रयत्न सामायिक करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
डॉक्टरांनी माहिती दिली की प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी त्यांचा मुलगा त्याच्या वहीतून कोरी पाने काळजीपूर्वक काढतो आणि डॉक्टर ती एकत्र चिकटवून कच्च्या कामासाठी वापरतात.
वर उल्लेख केलेल्या डॉक्टरांच्या ट्विट संदेशाला उत्तर देताना पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणतात;
“शाश्वत जीवनाच्या व्यापक संदेशासह हा एक चांगला सांघिक प्रयत्न आहे. तुमच्या मुलाचे आणि तुमचे अभिनंदन.
इतरांनाही आवाहन कि त्यांनी असेच प्रयत्न सामायिक करावे, ज्यामुळे पुनर्वापर आणि ‘टाकाऊ पासून संपत्ती’ याविषयी अधिक जागरूकता निर्माण होईल.”
***
Nilima C/Vasanti/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1904860)
आगंतुक पटल : 247
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam