पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान, 12 फेब्रुवारी रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याचे करणार उद्घाटन


महर्षी दयानंद सरस्वती या महान समाजसुधारकांनी 1875 मध्ये तत्कालीन सामाजिक विषमतेचा सामना करण्यासाठी आर्य समाजाची स्थापना केली

देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनात आर्य समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार, समाजसुधारक आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा, विशेषत: ज्यांचे योगदान अद्याप देशव्यापी स्तरावर देण्यात आलेले नाही, त्यांचा गौरव करण्यासाठी वचनबद्ध आहे

Posted On: 11 FEB 2023 1:45PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याचे उद्घाटन करतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

महर्षी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी झाला. ते महान समाजसुधारक होते. त्यांनी तत्कालीन सामाजिक विषमतेचा सामना करण्यासाठी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाने सामाजिक सुधारणा आणि शिक्षणावर भर देऊन देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

समाजसुधारक आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा, विशेषत: ज्यांचे योगदान देशव्यापी स्तरावर नेण्यात हवे, त्यांचा गौरव करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. भगवान बिरसा मुडा यांची जयंती जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित करण्यापासून ते अरबिंदांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यापर्यंत, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा उपक्रमांचे नेतृत्व करत आहेत.

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1898266) Visitor Counter : 209