पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मन की बातसाठी कल्पना आणि सूचना पाठवण्याचे केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
13 NOV 2022 9:51PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 27 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’च्या आगामी भागासाठी कल्पना आणि सूचना पाठविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मायगव्ह तसेच नमो ॲपवर या कल्पना आणि सूचना सामायिक करता येतील किंवा आपले संदेश 1800-11-7800 या क्रमांकावर ध्वनिमुद्रित करता येतील.
मायगव्ह वर आवाहन सामायिक करताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे,
"27 तारखेला प्रसारित होणाऱ्या या महिन्याच्या #MannKiBaat साठी तुमच्याकडे काही कल्पना आणि सूचना आहेत का? त्या जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे... मायगव्ह, नमो ॲपवर त्या सामायिक करा. तुमचा संदेश 1800-11-7800 वर ध्वनिमुद्रित सुद्धा करू शकता.
******
Madhuri P/Sampada P./CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1875721)
आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
Bengali
,
Kannada
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam