पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रीकांत किदांबीचे केले अभिनंदन


राष्ट्रकुल स्पर्धेतील चौथे पदक श्रीकांतच्या कौशल्य आणि सातत्याचे प्रतिक : पंतप्रधान

Posted On: 08 AUG 2022 8:25AM by PIB Mumbai

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकांत किदांबीचे  राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. श्रीकांत किदांबीच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील चौथ्या  पदकाबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

 या संदर्भात पंतप्रधानांनी ट्विट केले की;

 "भारतीय बॅडमिंटनच्या दिग्गजांपैकी एक, श्रीकांत किदांबीने त्याच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील वैयक्तिक सामन्यात कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील त्याचे हे चौथे पदक त्याचे कौशल्य आणि सातत्य दर्शवणारे आहे.त्याचे अभिनंदन. तो नवोदित खेळाडूंना प्रेरणा देत राहो आणि भारताला आणखी अभिमान वाटावा अशी कामगिरी करत राहो.  #Cheer4India"


Jaydevi PS/GD/CY


(Release ID: 1849665) Visitor Counter : 172