पंतप्रधान कार्यालय
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" साजरा केला
राव इंद्रजित सिंग यांनी या कार्यक्रमाचे केले उद्घाटन
Posted On:
28 JUN 2022 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2022
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अनेक उपक्रमांच्या आयोजनाद्वारे 27 जून 2022 पासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताह साजरा करत आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना आणि आयपीएम विभागाने 28 जून 2022 रोजी नवी दिल्लीतील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर येथे कार्यक्रम आयोजित केला.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राव इंद्रजित सिंग यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमात खासदार स्थानिक क्षेत्र विकास (MPLADS) योजनेची विविध वैशिष्ट्ये, दीर्घकाळ टिकणाऱ्या सामुदायिक मालमत्तेच्या विकासामध्ये या योजनेची भूमिका आणि योगदान एका लघुनाटिकेद्वारे तसेच एमपीलॅड्स योजनेवरील लघुपट आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात आले.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837754)
Visitor Counter : 178
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam