पंतप्रधान कार्यालय

14 व्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

Posted On: 21 JUN 2022 3:00PM by PIB Mumbai

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 23-24 जून  2022 दरम्यान चीन ने आयोजित केलेल्या ब्रिक्स परिषदेत दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. यामध्ये अतिथी देशांसह 24 जून रोजी होणाऱ्या जागतिक विकासाबाबतच्या उच्च स्तरीय संवादाचा समावेश आहे.  

2. ब्रिक्स हे विकसनशील देशांशी संबंधित सामायिक मुद्द्यांवर चर्चा आणि विचारविनिमय करण्याचे व्यासपीठ बनले आहे. बहुपक्षीय प्रणाली अधिक प्रातिनिधिक आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी त्यामध्ये सुधारणा करण्याचे आवाहन ब्रिक्स देशांनी नियमितपणे केले आहे.

3. 14 व्या ब्रिक्स परिषदे दरम्यान होणाऱ्या चर्चेत  दहशतवादाचा सामना, व्यापार, आरोग्य, पारंपरिक औषधे, पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन, कृषी, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण आणि एमएसएमई यासारख्या क्षेत्रांमध्ये ब्रिक्स देशांमधील परस्पर  सहकार्य या मुद्द्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या चर्चेत बहुपक्षीय प्रणालीमधील सुधारणा, कोविड-19 महामारीचा सामना आणि जागतिक आर्थिक क्षेत्राची भरपाई या अन्य मुद्द्यांचा देखील समावेश होण्याची शक्यता आहे.

4. परिषदेपूर्वी 22 जून 2022 रोजी होणाऱ्या ब्रिक्स व्यापार मंचाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान ध्वनिमुद्रित केलेल्या बीज भाषणाच्या माध्यमातून सहभागी होतील.

 

****

Jaydevi PS/ R Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837084) Visitor Counter : 90