पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा, गुजरात येथे गौरव अभियानात केलेले भाषण

Posted On: 18 JUN 2022 11:54PM by PIB Mumbai

 

 

भारत माता की - जय, भारत माता की - जय, गुजरातचे लोकप्रिय मृदु आणि कणखर आपल्या सर्वांचे  प्रिय मुख्यमंत्री  भूपेंद्र भाई, संसदेतील माझे सहकारी सीआर पाटीलकेंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी  देवु सिंह, दर्शना ताई , गुजरात सरकारचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि वडोदरा व्यतिरिक्त आणंद, छोटा उदयपुर, खेड़ा आणि पंचमहाल जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने इथे आलेल्या विशेषतः माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो,

आजचा दिवस माझ्यासाठी मातृवंदना दिवस आहे. आज सकाळी जन्मदात्री आईचे आर्शीवाद घेतले, त्यानंतर  जगत जननी कालीमातेचे आर्शीवाद घेतले आणि आता मातृशक्तीचे विराट रूप पाहिले, त्यांचे आर्शीवाद घेतले.  आज मला पावागड इथे कालीमातेच्या भक्तांसाठी अनेक आधुनिक सुविधांचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. मी मातेकडे देशवासीयांचे सुख-शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आणि स्वातंत्र्याच्या अमृतकाळात स्वर्णिम भारताच्या संकल्प  सिद्धीसाठी कालीमातेकडे आशीर्वाद मागितले.

 

बंधू आणि भगिनींनो,

मला आनंद आहे की संस्कारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडोदरा इथे आज सुमारे 21 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे. हे प्रकल्पगुजरातच्या विकासातून भारताचा  विकास, या वचनबद्धतेला बळ देणारे आहेत. गरीबांसाठी घरेउच्च शिक्षण आणि उत्तम  कनेक्टिविटी यावर एवढी मोठी गुंतवणूक गुजरातचा औद्योगिक विकास विस्तारेल, इथल्या युवकांसाठी रोजगार-स्वयंरोजगार यासाठी अगणित संधी निर्माण करेल. या प्रकल्पांमध्येही बहुतांश प्रकल्प आपल्या भगिनी-मुलींच्या आरोग्य, पोषण आणि  सशक्तिकरणाशी संबंधित आहेत.  आज इथे लाखोंच्या संख्येने माता-भगिनी आपल्याला  आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत. मी  गुजरात सरकारचेभूपेंद्र भाईंचे आणि भाजपा  प्रदेश अध्यक्ष सी आर पाटिल यांचे खास आभार मानू इच्छितो.कारण त्यांनी मला तुमच्याकडे आणले आहे. आणि तिथून  प्रवेश केला आणि गाडीने इथे पोहचता-पोहचता  15-20 मिनिटे लागली. पायी आलो असतो तर माहित नाही किती वेळ लागला असता. एवढा  विशाल जनसागर, मात्र मी यासाठी  धन्यवाद देतो कारण जेव्हा मी सगळ्यांमधून निघत होतो तेव्हा मला आज त्या शेकडो चेहऱ्यांना देखील प्रणाम करण्याची संधी मिळाली ज्यांच्याबरोबर  अनेक वर्षे  काम करण्याची मला संधी मिळाली होती. काही असे  ज्येष्ठ कार्यकर्ते मला दिसले , ज्यांचे बोट पकडून मी कधी चाललो होतो. अशा अनेक माता भेटल्या ज्यांना मी नतमस्तक होऊन वंदन केले, कधी काळी मला त्यांच्या हातच्या पोळ्या खाण्याचे सौभाग्य लाभले होते. आज माझ्यासाठी अशा शेकडो लोकांना भेटणे, त्यांचे आशीर्वाद घेणे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण होता आणि म्हणूनच मी  गुजरात प्रदेशभूपेंद्र भाई आणि  सरकारला आणि तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. गेल्या  8 वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार, नारीशक्तीला भारताच्या सामर्थ्याचा केंद्रबिंदू बनवण्याचे जे प्रयत्न करत आहेत, आज गुजरात मध्ये कालिकामातेच्या आशीर्वादाने त्यांना नवी ताकद मिळाली आहे.  मी सर्व भगिनींचे , सर्व लाखो लाभार्थ्यांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

21 व्या शतकातील भारताच्या जलद विकासासाठी महिलांचा जलद विकास, त्यांचे सक्षमीकरण तेवढेच आवश्यक आहे. आज भारत, महिलांच्या गरजा त्यांच्या  आकांक्षा लक्षात घेऊन योजना आखत आहे, निर्णय घेत आहे. सैन्यापासून खाणींपर्यंत, आमच्या  सरकारने महिलांसाठी आपल्या आवडीचे काम करण्यासाठी सारे मार्ग खुले केले आहेत. त्या मातांनी त्या संधींचा लाभ घ्यावा अशी स्थिती आज आपण निर्माण केली आहे. आम्ही महिलांच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा लक्षात घेऊन अनेक नव्या योजना आखत आहोत. महिलांचे जीवन सुखकर व्हावे, त्यांच्या आयुष्यातील अडचणी कमी व्हाव्यात, त्यांना पुढे जाण्याच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात याला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. हे मी माझे सौभाग्य मानतो की मला माता-भगिनी -मुलींची इतकी सेवा करण्याची संधी मिळाली आहे.  वडोदरा आणि  आसपासच्या परिसरातून आलेल्या माता-भगिनी -मुलींचे मी पुन्हा एकदा  अभिनंदन करतो. या शहराने कधी काळी मलाही सांभाळले होते. माझेही  लालनपालन केले होते. वडोदरा हे मातृशक्तिच्या उत्सवासाठी एक उपयुक्त शहर आहे कारण ते मातेप्रमाणे संस्कार करणारे शहर आहे, वडोदरा संस्कारांचे शहर आहे. हे  शहर इथे येणाऱ्या प्रत्येकाला  हर प्रकारे सांभाळून घेते, सुख-दुःखात साथ देते, आणि पुढे जाण्याची संधी देते. या शहरात वडोदऱ्यात आल्यावर जुने सगळे काही आठवते. कारण बडोद्याने मला जसे आई आपल्या मुलाला सांभाळते तेवढ्याच आपुलकीने मलाही सांभाळले आहे. संपूर्ण विकासयात्रेतील बडोद्याचे योगदान मी कधीही विसरू शकत नाही. हे शहर प्रेरणा देणारे शहर आहे, या शहराने  स्वामी विवेकानंद, महर्षि अरविंद, विनोबा भावे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांना देखील प्रेरित केले आहे. तुम्हा सर्वांनाही आठवत असेल, माझ्या तर  चांगलेच लक्षात राहणे  स्वाभाविक आहे. कारण बेलूर मठाचे  अध्यक्ष आणि माझ्या किशोरावस्थेत ज्यांनी मला आयुष्यातील अनेक मार्गांबाबत मार्गदर्शन केले, एखाद्या गुरुजी प्रमाणे माझ्या आयुष्याला आकार देण्यात खूप मोठी भूमिका पार पाडली . एकदा  बेलूर मठ , रामकृष्ण मिशन मठचे  अध्यक्ष स्वामी आत्मस्थानंदजी यांच्या उपस्थितीत मला इथे वडोदऱ्यात दिलाराम बंगला रामकृष्ण मिशन कडे सुपूर्द करण्याची संधी मिळाली होती. आपली जुनी  शास्त्री पोल, आपले  रावपूरा आणि आपला  आराधना सिनेमा जवळचा  पंचमुखी हनुमान, खूप साऱ्या आठवणी आणि या सर्व ठिकाणी अनेक लोकांच्या भेटीगाठी व्हायच्या. पंचमहाल, कालोल, हालोल, गोधरा डभोई, छोटाउदेपूर. मोजूही शकत नाही, आणि जुने सर्व सहकारी , त्यांच्याही आठवणी ताज्या झाल्या. आणि जेव्हा बडोद्याचा विषय निघतो तेव्हा हिरवा  चिवडा कसा विसरू शकतो. आणि आपली  बाकरवडी आजही जे लोक बडोद्याला चांगले ओळखतात, आणि ते बाहेर मला भेटले तर इथला हिरवा चिवडा आणि बाकरवडीची आठवण काढतात. मित्रांनो,

2014 मध्येही जेव्हा मी आयुष्यात प्रथमच लोकसभेची निवडणूक लढत होतोराष्ट्रसेवेची जबाबदारी पार पाडण्यासाठी मला वड़ोदराचे  नवनाथ आणि  काशी विश्वनाथ दोघांचाही आशीर्वाद मिळाला, याहून मोठे  सौभाग्य काय असू शकते ? आज गुजरातच्या भगिनी-मुली, यांच्यासाठी माझ्या दृष्टीने  अतिशय  महत्वपूर्ण दिवस आहे.निरोगी मातृत्व आणि सुदृढ बालपण सुनिश्चित करण्यासाठी गुजरात सरकारने आज 2 मोठ्या योजना सुरु केल्या आहेत. मी भूपेंद्र भाई यांचे या योजनांसाठी अभिनंदन करतो. 800 कोटी रुपयांची मुख्यमंत्री मातृशक्ति योजना हे सुनिश्चित करेल की गरोदरपणात आणि प्रसूतीनंतरच्या सुरुवातीच्या दिवसात मातांना पौष्टिक आहार मिळेल तसेच पोषण सुधा योजनेचाही विस्तार आता गुजरातच्या सर्व आदिवासी बहुल भागात करण्यात आला आहे. आता मला  1 कोटी 36 लाख लाभार्थी भगिनी , सव्वा कोटींहून अधिक भगिनी यांच्यासाठी 118 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरीत करण्याची संधी मिळाली आहे. आता  विचार करा, सव्वा कोटी भगिनी म्हणजेच सुमारे सव्वाशे कोटी रुपये , मातेचे आरोग्य केवळ मातेचे नाही तर भावी पिढ्यांचे देखील प्रभावित करते.मातृत्वाचे सुरुवातीचे 1000 दिवस, आई बरोबरच मुलांचे जीवनही ठरवते. कच्चा आणि  बच्चा दोघांची चिंता. कुपोषण आणि ऍनिमियाची समस्या, हे सध्याच्या घडीला सर्वात मोठे संकट आहे. 2 दशकांपूर्वी जेव्हा गुजरातने मला सेवेची संधी दिली, तेव्हा इथे एक खूप मोठे आव्हान होते. तेव्हापासून आम्ही एकापाठोपाठ एक या दिशेने  काम करण्याची संधी दिली. ज्याचे सार्थक  परिणाम आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजपासून गुजरातच्या भगिनींसाठी मुख्यमंत्री मातृशक्ती योजना सुरु झाली आहे.  मातृत्व सुख प्राप्त करणाऱ्या महिलाना याचा विशेष होईल.

या योजने अंतर्गत दोन  किलो चणेएक किलो तूरडाळ, प्रथिनांच्या दृष्टीने खूप आवश्यक गोष्टी आहेत. म्हणूनच आम्ही खूप विचारपूर्वक हे पॅकेज तयार केले आहे. या व्यतिरिक्त एक लीटर तेल. हे भगिनींना मिळेल. एवढेच नाही कोरोना काळापासून मी एक काम सुरु केले आहे. या देशातील  गरीब कुटुंबांच्या घरातील चूल बंद होऊ नये यासाठी 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य आजही त्यांच्या घरी पोहचत आहे. जगभरातील लोक, 80 कोटी लोकांना दोन वर्षे धान्य, हे ऐकूनच त्यांना आश्चर्य वाटते.

ही  योजना कुपोषण आणि एनिमिया पासून मातेला, बाळाला , नवजात बाळाला वाचवण्यात मोठी मदत करते. आज मोठे पुण्याचे  काम केले आहे. आणि  नवजात शिशुच्या सेवेचे काम  भूपेन्द्रभाईच्या नेतृत्वाखाली गुजरातचे सरकार करत आहे.

आपले छोटा उदेपूर, आपले कवांट, आपले सर्व आदिवासी भाग, आपली सर्व आदिवासी कुटुंबे. त्यांच्यामध्ये काम करण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे, तसेच आदिवासी भगिनी आणि मुले, त्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत.

अनेक आदिवासी भागात आमच्या बहिणी सिकलसेल आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांना सिकलसेलपासून मुक्त होण्यासाठी आम्ही गुजरातमध्ये सिकलसेल सोसायटीची स्थापना केली. सिकलसेल मुक्तीसाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आमचे सरकार आल्यानंतर हा सिकलसेल आला नाही. शेकडो वर्षांपासून ही समस्या होती. अनेक सरकारे आली पण त्यांनी काही केले नाही.

सिकलसेलला गांभीर्याने घेत त्यावर मात करण्याचा आम्ही विडा उचलला, सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष केंद्रे स्थापन केली, लाखो आदिवासी बांधवांची तपासणी करून त्यांच्या चाचण्या घेतल्या. या यशस्वी कार्यक्रमासाठी, गुजरातला केन्द्र सरकारचा, पंतप्रधान नागरी सेवा पुरस्कार मिळाला आहे.

गुजरातने नेहमीच पोषणावर भर दिला आहे. आपल्या गुजरातमध्ये दूध संजीवनी, पोषणयुक्त मीठ, टेक होम रेशन, पोषण संवाद असे अनेक कार्यक्रम राबवून देशाला नवी दिशा दाखवली. अशा योजनांच्या लाभार्थी भगिनींची संख्या आज सातत्याने वाढत आहे. अशा सुमारे 58 लाख भगिनींना या सर्व योजनांचा लाभ मिळत आहे. दूध संजीवनी योजनेमुळे आदिवासी भागातील सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील मुलांची काळजी घेण्यासाठी, त्यांना आवश्यक असलेल्या इतर गोष्टींसह पोषणयुक्त बाबी उपलब्ध केल्या आहेत. 20 लाखांहून अधिक गरोदर माता आणि स्तनदा माता यांना तर अगदी दुप्पट पोषणयुक्त मीठाची काळजी घेण्यात आली. 14 लाख मुलांना अंगणवाडीत पिठापासून बनवलेले अन्न मिळावे, आपली मुले निरोगी व्हावीत, आपल्या 15 ते 18 वर्षांच्या मुलींना चांगले पोषण मिळावे यासाठी पूर्णा योजना राबवली.

त्या अंतर्गत 12 लाखांहून अधिक मुलींना लोह सप्लिमेंट, लोह तत्व, घरपोच रेशन, अशा अनेक सेवा पुरवल्या गेल्या. सांगण्याचा अर्थ म्हणजे, चांगल्या पोषणासाठी जे काही उपाय योजले पाहिजेत, अशा अनेक उपाययोजना करून त्यांच्या कल्याणाचे काम केले. पोषण सुधा योजना हे या क्रमातील एक मोठे पाऊल आहे. दाहोद, वलसाड, महिसागर, छोटा उदयपूर आणि नर्मदा या आदिवासी भागातील काही तालुक्यात 4-5 वर्षांपूर्वी पोषण सुधा योजना सुरू करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये, आदिवासी भगिनी आणि मुलांवर त्याचे सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन, सकारात्मक परिणाम मिळण्यासाठी त्याचा विस्तार सर्व आदिवासी जिल्ह्यांमध्ये करण्यात आला. याचा लाभ दर महिन्याला सुमारे 1 लाख 36 हजार आदिवासी माता-भगिनींना होणार आहे. या योजनेंतर्गत गरोदर आणि स्तनदा मातांना अंगणवाडीत एकाच वेळी गरम आहार, लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्याही दिल्या जाणार आहेत.

आम्ही केवळ पोषण आराखडा बनवला नाही, तर लाभार्थी भगिनी आणि मुलांपर्यंत सुविधा योग्य प्रकारे पोहोचतील याची काळजीही घेतली आहे. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मला तंत्रज्ञान वापरण्याची संधी मिळाली. त्यावेळी ममता पोर्टल सुरू झाले आणि गेल्या 8 वर्षांत सुमारे 12 लाख अंगणवाडींना उपकरणे देण्यात आली. गुजरातमध्येही हजारो भगिनींना उपकरणे देण्यात आली आहेत.

या अंतर्गत गुजरातसह देशभरातील सुमारे साडेअकरा कोटी लाभार्थी भगिनी आणि मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी रिअल टाइम मॉनिटरिंग केले जात आहे. या पोषण सुधा योजनेच्या विस्तारावर लक्ष ठेवण्यासाठी मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. गुजरातच्या यशस्वी अनुभवांचा विस्तार करून, देशात कुपोषण आणि पंडुरोगाच्या समस्येविरुद्ध मोहीम सुरू केली जात आहे. देशात प्रथमच आता सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरातमध्ये तो (श्रावणात) सावन-भादो महिन्यात असतो. गुजरातच्या भगिनींचीही या मोहिमेला मोठी मदत होत आहे. पोषण म्हणजे केवळ खाण्या-पिण्याचे नव्हे, तर त्यांच्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे, आवश्यक छोट्या-मोठ्या सुविधा, स्वच्छ भारत अभियान, घरोघरी शौचालये, ही माता-भगिनींचे आरोग्य सुधारण्याची साधने आहेत. उज्ज्वला योजना, गॅस कनेक्शन. घरातील धुरामुळे शेकडो सिगारेट एवढा धूर आम्हा बहिणी-बहिणींच्या फुफ्फुसात जात असे. त्यापासून वाचवण्याचे काम याने केले आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत 36 लाखांहून अधिक कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. घरोघरी नळातून पाणी. मातांच्या डोक्यावरून हंडे काढण्याचे सौभाग्यही आमच्या नशिबी आले आहे. पाईपद्वारे पाणी घेऊन त्यांची काळजी घेतली आहे. माता-भगिनींचा त्रास कमी होतो, प्रदूषित पाण्यापासून मुक्ती मिळते आणि पाणी चांगले असेल तर अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. पंतप्रधान मातृ वंदना योजनेंतर्गत गुजरातसह देशभरातील कोट्यवधी मातांवर सुमारे 11 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. या योजनेअंतर्गत गुजरातमधील 9 लाख भगिनींनाही याचा लाभ मिळत आहे. सुमारे 400 कोटी रुपये खर्चून त्यांना गरोदरपणात पोषण मिळण्यास मदत केली जाते. गुजरातमधील महिलांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही निर्णय घेण्याच्या ठिकाणी अधिक संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांची व्यवस्थापन क्षमता जाणून गावाशी संबंधित अनेक प्रकल्पांमध्ये भगिनींना नेतृत्वाची भूमिका देण्यात आली आहे. गुजरातच्या भगिनींनी पाणी समितीमध्ये केलेल्या कौतुकास्पद कार्यामुळे आज देशातील भगिनीही जल जीवन अभियानाला नेतृत्व देत आहेत.

गुजरात हे देशातील एक असे राज्य आहे जिथे पंचायती राज संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. ग्रामीण भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, गुजरातमध्ये, जेव्हा आम्ही 50 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त सुवर्ण महोत्सव साजरा करत होतो, त्यावेळी मिशन मंगलम सुरू केले. त्याअंतर्गत 12 वर्षात 2 लाख 60 हजारांहून अधिक सखी मंडळे, बचत गट बनले आहेत. 2.5 लाखांहून अधिक गट आहेत, ज्यामध्ये 26 लाखांहून अधिक ग्रामीण भगिनींचा सहभाग आहे. आपल्या गावातील आदिवासी, दलित, शोषित बहिणी, मोठ्या संख्येने जोडल्या गेल्या आहेत. या गटांना विविध प्रकल्पांतर्गत बँकांकडून लाखो कोटी रुपये मिळाले आहेत. भगिनी आणि मुलींनी कुटुंबांची आर्थिक ताकद वाढवावी आणि त्यांनी अर्थव्यवस्थेतही सक्रिय सहभाग घ्यावा, असा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.

2014 मध्ये केंद्रात सरकार स्थापन होताच आम्ही जन धन बँक खात्याच्या खूप मोठ्या राष्ट्रीय योजनेवर काम केले. या योजनेअंतर्गत गुजरातमध्ये लाखो भगिनींची बँक खाती उघडण्यात आली. ती आज सर्व माता भगिनींच्या उपयोगी येत आहेत. अशा गरीब मातांना एवढ्या भयंकर कोरोना आजाराच्या संकटाचा सामना करावा लागला. थेट त्यांच्या खात्यात पैसे पाठवून, माझ्या माता-भगिनींच्या सन्मानाने जगण्याची व्यवस्था केली. मुद्रा योजना, स्वयंरोजगार योजनेंतर्गत बँकेकडून कोणत्याही प्रकारच्या हमी शिवाय पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आली. आणि मला आनंद आहे की देशातील 70 टक्के महिला मुद्रा योजनेचा लाभ घेत आहेत. केंद्र सरकारने 10 लाख रुपयांचे कर्ज घेतलेल्या सखी मंडळाची मर्यादा आता 20 लाख करण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवता येईल. आणि जेव्हा मी म्हणतो हे डबल इंजिन सरकार आहे. चहुबाजूने विकास वेगाने होत आहे हा डबल इंजिन सरकारनुळे झालेला फायदा आहे. या कार्यक्रमात आज 1 लाख 40 हजार गरिबांना पक्की घरे मिळाली आहेत. कल्पना करा की सुमारे 1.5 लाख कुटुंबांना राहण्यासाठी पक्की घरे मिळत आहेत. अशी दीड लाख कुटुंबे जी आधी कच्च्या घरात, झोपडीत, पदपथावर राहत होती. मिळणारे घर बऱ्याचदा महिलेच्या नावावरच असावे असा माझा नियम आहे. आज या घरांची किंमत पाहिली तर या महिला करोडपती झाल्या आहेत.

आम्ही इतके मोठे काम केले आहे. या घरांच्या रूपाने 3 हजार कोटींहून अधिकची मालमत्ता बहिणींच्या नावावर झाली आहे. कोणी कल्पना करू शकतो का की आज हा तुमचा मुलगा बसला आहे, ज्याच्यामुळे या माता-भगिनी 3000 कोटींच्या संपत्तीच्या मालक झाल्या आहेत. या त्या बहिणी आहेत ज्यांच्या नावाने आयुष्यात कधीच काही नव्हते. घर नव्हते, जमीन नव्हती, काहीही नव्हते. त्यांच्या नावावर 3000 कोटींची संपत्ती. हा मुलगा त्यांचे काम करतोय, मातृभक्तीने करतोय.

शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांची स्वप्नेही पूर्ण केली. गुजरातच्या शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी घरे बांधण्याबाबतही गेल्या काही वर्षांत अभूतपूर्व काम झाले आहे. आतापर्यंत मंजूर साडेदहा लाख घरांपैकी शहरी गरीब कुटुंबांना सुमारे 7.50 लाख घरे मिळाली आहेत.

गुजरातमधील सुमारे साडेचार लाख मध्यमवर्गीय कुटुंबांनाही घरे बांधण्यासाठी मदत देण्यात आली आहे. वडोदरा, आनंद, छोटा उदयपूर, खेडा, पंचमहाल, नर्मदा, दाहोद,या  माझ्या मध्य गुजरातेतील, त्याच्या चार जिल्ह्यात राहणाऱ्या भगिनींना या सरकारी योजनेचा लाभ मिळाला आहे.

केंद्र सरकारने,गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना शहरांमध्ये वाजवी भाड्यात राहण्यासाठी घरे देण्याची योजना आखली आहे. ज्यामध्ये आज गुजरात राज्य संपूर्ण देशात अग्रेसर राज्य बनले आहे. घरासोबतच जे हातगाडीवाले, चारचाकी हातगाड्या घेऊन बाहेर पडतात त्यांनाही पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत बँकेकडून कर्ज मिळाले आहे. हे लोक पूर्वी कर्ज घेऊन व्याज भरत रहायचे. हे हातगाडीवाले, अशा छोट्या धंदा करणाऱ्यांना मदत करण्याचा आम्ही विडा उचलला आहे,(हे कार्य आम्ही हाती घेतले आहे.) गुजरातचा विकास यशस्वी व्हावा आणि आधुनिकता लाभावी, या दिशेने गेल्या 20 वर्षांत आम्ही कार्य केलेले आहे. एकीकडे गुजरातमधील प्रत्येक नागरिकाचे, आपल्या भगिनींचे, आपल्या आदिवासींचे, आपल्या मागासलेल्या दलित बंधू-भगिनींच्या समस्या प्रश्न सोडवल्या पाहिजेत, तर दुसरीकडे दळणवळण,पायाभूत सुविधा निर्माण करत औद्योगिक बळ दिले पाहिजे कारण आपल्याला इथेच थांबायचं नाही तर आपल्याला वेगाने प्रगती घडवून आणायची गरज आहे,त्यामुळे कामही रेल्वेने व्हायला हवे. दळणवळण मार्ग विकसित करण्याच्या तपशिलात मी जात नाही भूपेंद्रभाईंनी त्याबद्दल सांगितले आहे, सतत रेल्वे कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी, गुजरातमध्ये 16000 कोटींचे प्रकल्प येत आहेत. आज,न्यू पालनपूर ते न्यू मदार विभागातील साडेतीनशे किलोमीटरहून अधिक मार्गाचे लोकार्पण होत आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे या प्रकल्पालाचे कामही प्रगतीपथावर आहे.भारतीय रेल्वेला औद्योगिकीकरण आणि व्यावसायिक कामाला अधिक मजबूत करण्यासाठी लागणारे वातावरण निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. साबरमती बोताड रस्त्याचे चौपदरीकरण, अहमदाबाद पिपावाव बंदराला जोडणारे वेगवेगळे छोटे पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आमची बंदरे सतत सुरू राहतील,अशाप्रकारचे कनेक्टिव्हिटीचे काम गुजरातमध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे लोकांचे  जीवन सुकर झाले आहे,ज्या शांततामय जगण्याच्या पद्धती बद्दल मी बोलतो तसे. गुजरातमधील पर्यटन क्षेत्राचा वाटा खूप मोठा आहे आणि तुमचे बडोदा तर खूपच छान आहे. जर एखाद्या दिवशी कुणी पाहुणे आले आणि एक दिवस त्यांना कुठे घेऊन जायचे असेल तर कुठे त्यांना घेऊन जावं? आपण आपल्या नव्याने बांधलेल्या पावागडावर जाऊ, मां कालीकडे जाऊ, तीन-चार दिवस पाहुण्यांना कुठेतरी घेऊन जायचे असेल तर, मग आपल्या एकता नगरीला केवाडियाला घेऊन जाऊ, तीन-चार दिवस पाहुण्यांची सरबराई करु आणि दाखवून देऊ की आम्ही किती अग्रेसर आहोत तेबडोद्याच्या लोकांना सांगा, इकडची माणसं अत्यंत सुखात आहेत (त्यांची पाची बोटं तुपात आहेत,) आमचा पालनपूर राधनपूर विभाग कच्छला उर्वरित देशाशी जोडण्याचे काम करत आहे, ज्यामुळे कच्छचे शेतकरी आज कच्छच्या वाळवंटी भागात शेती करत आहेत.कच्छमध्ये चोर शेती होत आहे, तुम्ही परदेशात जात आहात, कच्छची पिके परदेशात जात आहेत, कृषी उत्पादने रेल्वे कनेक्टिव्हिटीद्वारे भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचणे आज सहजसाध्य झाले आहे. बडोद्याच्या आधुनिक कनेक्टिव्हिटीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.बडोद्याचे आधुनिक बसस्थानक विमानतळापेक्षा हे चांगले आहे हे आपणास  माहीत आहे‌ का, बनवलंय की नाही? विमानतळापेक्षा ते चांगले आहे की नाही? आणि आज संपूर्ण भारतात त्याचीच चर्चा आहे, इतकेच नाही तर आपला गुजरात अहमदाबाद बडोदा एक्सप्रेस हायवे बघायला लोक येतात एवढेच नाही तरअहमदाबाद बडोदा एक्सप्रेस हायवेचा विस्तार जसा होत आहे ते पाहूनच आता मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे बनवला जात आहे, एवढेच नाही तर बडोदा ते मुंबई बुलेट ट्रेन अशी हायस्पीड रेल्वे सुध्दा थोड्याच दिवसात आपल्यासमोर असेल, तुम्ही विचार करा,बडोद्याला किती मोठी ताकद मिळणार आहे. आमचे छावणी रेल्वे स्थानक ते देखील नवीन स्वरूपात विकसित होत आहे, आमचे बडोदा विमानतळ त्यातसुद्धा लकाकी येत आहे आणखी दोन नवीन हरित विमानतळांची तयारी देखील सुरू आहे स्मार्ट सिटी अमृत योजना, मुख्यमंत्री शहरी विकास योजना डबल एन चीन डबल लाभ माझ्या बडोद्याला मिळणार आहे. बडोदा स्मार्ट होण्यासाठी 1000 कोटी रुपयांचे 25 बडोदा प्रकल्प मंजूर झाले आहेत आणि त्यापैकी सुमारे 16 प्रकल्प पूर्ण होत आले आहेत. अमृत योजनेंतर्गत महापालिकेला 100 कोटी रुपये देण्यात आले आहेत आणि म्हणूनच मी वडोदरा महानगरपालिकेचे अभिनंदन करतो. सध्या हिमाचलमध्ये देशाच्या सर्व मुख्य सचिवांची बैठक सुरू होती. त्यातच विशेष म्हणजे एका अधिकाऱ्यानेआज वडोदरासाठी 100 कोटी रुपयांचे बाँड जारी केले असून त्यात त्यांनी जे यश मिळवले आहे त्याबद्दल मी हिमाचलमध्ये जाऊन त्यांचे अभिनंदन केले. मी आज येथे समक्ष येत आहे आणि वडोदरा महानगरपालिकेचे अभिनंदन करत आहे. आज आमचा सिंघ रोड, पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण , वडोदराच्या दक्षिण विस्तारात महिसागरचे पाणी अशा योजनांतून मला आमच्या माता-भगिनींचे आशीर्वाद मिळतील, नक्की मिळतीलच.

बंधू आणि भगिनींनो, आपल्या वडोदऱ्याची आणखी एक ओळख, म्हणजेच शिक्षण क्षेत्रातील याचे मोठे नाव, आमच्या एमएस युनिव्हर्सिटीचे नाव तर सगळीकडे गाजत आहे. आणि आता तर आपण शिक्षण, विज्ञान, न्याय क्षेत्रांतही पुढे जात आहोत. गेल्या वर्षी शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण विकास केंद्र म्हणून वडोदरा  नावाजले गेले. ट्रिपल आयटी, स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी, सर्व गुजरातच्या अंगणातील वडोदऱ्यात.बडोद्यामुळे माझी छाती फुगणे स्वाभाविक आहे. या देशातील पहिले, पहिले रेल्वे विद्यापीठ, हे देखील वडोदऱ्यात आहे, आणि आता गतिशक्ती विद्यापीठाच्या रूपात ते वडोदऱ्याच्या भूमीवर विस्तारत आहे. आणि त्यातून बाहेर शिकून बाहेर पडणाऱ्या लोकांचा, आजूबाजूच्या सर्व भागातील लोकांना फायदा होणार आहे. याचा फायदा देशभरातील लोकांना होणार आहे. आणि मग ते आमचे आणंद असो, छोटा उदेपूर असो किंवा मध्य गुजरातमधील इतर जिल्हे असोत. खेडा असो वा पंचमहाल किंवा दाहोद किंवा इकडचे आपले भरूच असो की नर्मदा, या सर्वांना फायदा होणार आहे. आणि नर्मदा येथील बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठ, गोध्रा येथील गोविंद गुरु विद्यापीठ, हे तर देशभरात आकर्षण बिंदू ठरले‌ आहेत.

 

बंधू आणि भगिनिंनो,

वडोदरा हे भारतातील सर्वात जुन्या कॉस्मोपॉलिटन शहरांपैकी एक आहे. देशातील असा एकही भाग नाही जिथून लोक इथे कामासाठी किंवा अभ्यासासाठी आले नाहीत. वडोदराच्या गरब्याचा आस्वाद संपूर्ण देशाने घेतला. वडोदरा 'मेक इन इंडिया'चा मजबूत आधार बनला आहे आणि विकासाच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वडोदरा हे सेवा केंद्रांचे केंद्र बनले आहे. तंत्रज्ञानाशी जोडलेल्यांना या ठिकाणाहून चालना मिळत आहे. बॉम्बार्डियर कंपनीने बांधलेले मेट्रोचे डबे इतर देशांमध्ये निर्यात केले जातात. तर मला सांगा, यामुळे वडोदराचा अभिमान वाटेल की नाही? जेव्हा इतर देशांतील लोक विचारतील की हे डबे कोठून आहेत? याचे उत्तर वडोदरा येथे तयार झाले असे मिळेल. ऑस्ट्रेलियात मेट्रो धावली आणि कुणी विचारलं तर कुठून आली? तर उत्तर येईल: भारताच्या वडोदरा येथून. सहकार आणि परोपकारिता हे गुजरात सरकारचे वैशिष्ट्य आहे. ही त्याची मूळ ताकद आहे. आणि डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांनी, सामाजिक संघटनांच्या बळावर, लोकसहभागातून, नागरी समाजाच्या मदतीने, विकासाच्या नवनवीन योजनांनी गुजरातचे सार्वजनिक जीवन सशक्त केले पाहिजे, गुजरातचे सामान्य जीवन सक्षम केले पाहिजे. गुजरातच्या येणार्‍या पिढीसाठी, उत्तम गुजरातच्या उभारणीसाठी, गुजरात अशा उत्कृष्ट भूमिकेने विकासाची नवीन उंची गाठत आहे. आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला दररोज नवनवीन काम करण्याची शक्ती देतात. देशाला नवीन उंचीवर नेण्यासाठी तुमचे आशीर्वाद आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असतात. तुमचे आशीर्वाद ही आमच्यासाठी एवढी मोठी शक्ती आहे की, या देशाची स्वप्ने साकार करण्यात आम्ही मागे पडत नाही आणि या कामात मग्न आहोत, मग आज पुन्हा एकदा माझा मातृदिन आहे आणि आज मला एवढी मोठी संधी पाहण्याची संधी मिळाली. माता-भगिनींची संख्या.मातांना बहिणींचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली, यापेक्षा सुंदर प्रसंग कोणता असू शकतो, गुजरातच्या आयुष्यात लाखो बहिणी एकत्र येऊ दे? तुम्हा सर्व मातांना वंदन, मातृशक्तीच्या सेवेसाठी तुमचे आशीर्वाद, मातृ भारतीची सेवा करण्याचे बळ आम्हांला देवो, याच अपेक्षेने तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आम्हा सर्वांवर कायम राहोत, खूप खूप शुभेच्छा, आपले खूप धन्यवाद.

***

S.Thakur/S.Kane/S.Patgaonkar/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1835285) Visitor Counter : 340