पंतप्रधान कार्यालय
युपीआय आणि डिजिटल पेमेंट्सची यशोगाथा डेटा सोनिफिकेशनच्या माध्यमातून पोहोचवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले आयआयपीचे कौतुक
Posted On:
13 APR 2022 2:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2022
डिजिटल पेमेंट्स आणि युपीआयच्या माध्यमातून भारतात झालेल्या व्यवहारांची यशोगाथा आणि महत्त्व ‘डेटा सोनिफिकेशन’ म्हणजेच कुठल्याही संवादाविना, केवळ पैशांच्या आवाजाच्या माध्यमातून, प्रभावीपणे पोहचवल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयपी- इंडिया इन पिक्सेलचे कौतुक केले आहे.
इंडिया इन पिक्सेल कंपनीने केलेल्या एका ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“डिजिटल पेमेंट्स आणि युपीआय विषयी मी अनेकदा बोलत असतो. मात्र, तुम्ही ज्या प्रकारे डिजिटल व्यवहार दाखवतांना, डेटा सोनिफिकेशन मध्ये केवळ पैशांचा आवाज वापरुन, ते दाखवले आहेत, ते खरोखर कौतुकास्पद आहे.
खूप रोचक, प्रभावी आणि अर्थातच माहितीपर !"
S.Thakur/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1816343)
Visitor Counter : 186
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam