पंतप्रधान कार्यालय
मुद्रा योजनेने असंख्य भारतीयांना त्यांचे उद्योजकीय कौशल्य दाखविण्याची आणि रोजगार निर्माते होण्याची संधी दिली : पंतप्रधान
Posted On:
08 APR 2022 8:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू झाल्यापासून, गेल्या सात वर्षात या योजनेने असंख्य भारतीयांना त्यांचे उद्योजकीय कौशल्य दाखविण्याची आणि रोजगार निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.या सात वर्षांत मुद्रा योजना गेम चेंजर ठरली असून प्रतिष्ठेसह समृद्धी वाढवण्यातही या योजनेचे योगदान आहे असे ते म्हणाले.
मायगव्हइंडियाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“#FundingTheUnfunded म्हणजेच निधी नसलेल्यांना निधीपुरवठा या मार्गदर्शक तत्त्वानुसार, मुद्रा योजनेने असंख्य भारतीयांना त्यांचे उद्योजकीय कौशल्य दाखविण्याची आणि रोजगार निर्माण करण्याची संधी दिली आहे.आज आपण #7YearsOfPMMY म्हणजेच मुद्रा योजनेची सात वर्ष साजरी करत असताना, ही योजना गेम चेंजर ठरली आहे आणि समृद्धी तसेच प्रतिष्ठा वाढविण्यातही ही योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे.”
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815068)
Visitor Counter : 270
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam