पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशात 29 मार्च रोजी पंतप्रधान आवास योजना -ग्रामीणच्या 5 लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या ‘गृह प्रवेश ’कार्यक्रमात होणार सहभागी


देशातील प्रत्येक गरजू कुटुंबाला पक्के घर देण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांच्या दिशेने आणखी एक पाऊल

प्रविष्टि तिथि: 28 MAR 2022 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मार्च 2022

 

मध्य प्रदेशातील पंतप्रधान आवास योजना -ग्रामीणच्या  सुमारे 5.21 लाख लाभार्थ्यांच्या ‘गृह प्रवेश’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील.

देशातील प्रत्येक गरजू कुटुंबाला सर्व मूलभूत सुविधांसह पक्के घर उपलब्ध व्हावे यासाठी  पंतप्रधान सातत्याने प्रयत्नशील असतात. या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे.

उद्या होणाऱ्या सोहळ्यात मध्य प्रदेशातील नवीन घरे शंख, दिवा, फुले आणि रांगोळी यांनी सुशोभित करण्यात येणार असून याप्रसंगी पारंपारिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशात पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) ची अंमलबजावणी अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. महिला गवंडीसह हजारो गवंडींना प्रशिक्षण देणे, फ्लाय ऐश विटांचा वापर करणे, याखेरीज प्रकल्पांवरील देखरेख व चांगल्या कार्यान्वयासाठी तंत्रज्ञानाचा वापर, सामग्रीचे केंद्रीकरण, कर्जाची उपलब्धता याद्वारे महिला स्वयं-सहायता गटांचे सक्षमीकरण यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण बाबी अंमलबजावणीदरम्यान पाहायला मिळत आहे.

 

* * *

S.Thakur/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1810478) आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam