पंतप्रधान कार्यालय
भारताने देशवासियांच्या लसीकरणासाठी घेतलेल्या प्रयत्नांमध्ये आजचा दिवस महत्त्वपूर्ण-पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांनी 12-14 वयोगटातील मुलांनी आणि 60 वर्षावरील नागरिकांना केली लस घेण्याची विनंती
Posted On:
16 MAR 2022 10:12AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस देशवासियांच्या लसीकरणासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. 12-14 वयोगटातील मुले आणि 60 वर्षावरील नागरिकांनी लसीची मात्रा घ्यावी, असे पंतप्रधान म्हणाले.
ट्वीट संदेशांमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"भारताने देशवासियांच्या लसीकरणासाठी घेतलेल्या प्रयत्नांमध्ये आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजपासून, 12-14 वयोगटातील मुले लसीकरणासाठी पात्र आहेत आणि 60 वर्षांवरील नागरीकांनी लसीची खबरदारीची मात्रा घ्यावी. या वयोगटातील नागरिकांना मी लसीकरणाची विनंती करतो."
"भारताने जागतिक जबाबदारीची भूमिका निभावत लसीकरण मैत्री (Vaccine Maitri) कार्यक्रमांतर्गत अनेक देशांना लस पाठवली. भारतीय लसींमुळे जागतिक पातळीवर कोविड-19 विरोधात सशक्तपणे लढता आले, याचा मला आनंद आहे."
"आज, भारताकडे अनेक ‘मेड इन इंडिया’ लसी आहेत. योग्य मुल्यमापन करुन आपण इतर लसींनाही मंजुरी दिली आहे. आम्ही आता या महामारीविरोधात लढण्यासाठी सुस्थितीत आहोत. तसेच आपल्याला कोविड संबंधित खबरदारीच्या उपाययोजनांचे नियमित पालन करत राहावे लागणार आहे."
***
S.Thakur/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1806434)
Visitor Counter : 267
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada