पंतप्रधान कार्यालय
पद्म पुरस्कार प्राप्त समाजसेविका शांती देवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2022 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2022
पद्म पुरस्काराने सन्मानित ख्यातनाम समाजसेविका शांती देवी जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
ट्विटरवरून प्रकाशित केलेल्या शोकसंदेशात पंतप्रधान म्हणतात,
"गरीब आणि वंचितांचा आवाज म्हणून शांतीदेवी कायम स्मरणात राहतील. दुःख दूर करण्यासाठी, तसेच अधिक निरोगी, स्वास्थ्यपूर्ण आणि न्यायाधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी निःस्वार्थपणे काम केले. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांच्या परिवाराच्या आणि असंख्य अनुयायी तसेच प्रशंसकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शांतिः ।
* * *
N.Chitale/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1790560)
आगंतुक पटल : 347
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam